आंभोळ -पैठण रस्ता बनला धोकादायक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

कोतुळ प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील आंभोळ ते पैठण या रस्त्यावर मोठे भगदाड पडल्याने रस्ता धोकादायक बनला आहे बांधकाम खात्याचे याकडे दुर्लक्ष आहे रात्रीचे वेळी या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता असल्याने तातडीने हा रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी होत आहे
सार्वजनिक बांधकाम विभाग अकोले विभागाचे या कडे दुर्लक्ष असल्याने अनेक दिवसापासून हा रस्ता धोकादायक बनलेला आहे अंभोळ गावात पैठण रस्त्यावर ओढ्याजवळ या रस्तावर मध्यभागी मोठा खड्डा पडल्याने धोकादायक बनला या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थांनी काही काठ्या व फेलक्स लावून याची जाणीव करून दिली आहे मात्र बांधकाम खात्याला याचे फारशे गांभीर्य दिसून येत नसल्याचे दिसते
अपघातापासून सावध राहण्याच्या सूचना स्थानिक नागरिकांनी सूचना वाहन चालकांना दिल्या मात्र बांधकाम खात्याने याबाबत निष्काळजीपणा दाखवला आहे या ठिकाणीच नजीक दशक्रिया विधी व स्मशानभूमी असल्याने नेहमी लोकांची वर्दळ असते खड्डा पडलेला रस्ता काँक्रिटीकरण करून रस्त्याची सुधारणा करावी अशी मागणी करण्यात आली आहे
