नाशिक रोटरी क्लब च्या उपक्रमांना हातभार लावावा अध्यक्ष रोटे मंगेश अपशंकर

.रोटरी इंटरनॅशनल तर्फे ऑक्टोबर हा महिना कॉम्युनिटी इकॉनॉमिक डेव्हलोपमेंट महिना म्हणून साजरा केला जातो. त्याला अनुसरून रोटरी क्लब ऑफ नासिक ही संस्था विविध उपक्रमांचे आयोजन करीत असते. रोटरी तर्फे दर रविवारी उदोजी मराठा बोर्डिंग, गंगापूर रोड ह्या परिसरात सकाळी ९ ते १२ वेळेत शेतकरी बाजार भरवला जातो. तिथे नासिक च्या आजूबाजूचे शेतकरी त्याच्या शेतात पिकवलेली ताजी व रसायनमुक्त भाजीपाला व फळे थेट ग्राहकांना पोहोचवतात. ह्या उपक्रमातून नागरिकांना विषमुक्त भाज्या व फळे माफक दरात मिळण्याबरोबरच शेतकऱ्यांना देखील एक फायदेशीर बाजारपेठ उपलब्ध होत आहे.
रोटरी क्लब ऑफ नासिक विविध शाळांमधून स्वच्छतेची व आरोग्याविषयी जागृती करते. लोकनेते वेंकटराव हिरे, विकास मंदिर, ZP च्या खंबाळे व कचरवाडी शाळांमध्ये जाऊन स्वच्छतेचे व खाण्यापिण्या आधी व नंतर हात धुण्याचे महत्व, दात घासण्याची पद्धत, मुलींसाठी menstrual hygiene, मुलांसाठी तंबाखू मुक्त जीवनाचे महत्व पटवून सांगण्यात येते. ह्या कमी रोटरीतील तज्ज्ञ डॉक्टर मंडळी डॉ मदनूरकर, डॉ संकलेचा, डॉ बुरड यांची मदत होते. त्याचबरोबर नाशिक च्या आजूबाजूच्या खेड्यापाड्या मध्ये ZP च्या शाळांमध्ये वह्या, लेखन साहित्य, विविध खेळांचे साहित्य, गृहोपयोगी वस्तू, रजया चादरी इ. चे वाटप करण्यात येते. हे उपक्रम राबवण्यामध्ये रोटे हेमराज राजपूत, रोटे उन्मेष देशमुख, रोटे संकेत कुलकर्णी, रोटे रफिक वोहरा, सेक्रेटरी गौरव सामनेरकर ह्यांचा पुढाकार असतो. रोटरी क्लब ऑफ नाशिक हि गेल्या ७९ वर्षांपासून सामाजिक कामांमध्ये अग्रगणी संस्था आहे. समाजातील विविध घटकांनी एकत्र यावे आणि मेम्बरशिप व देणग्या च्या स्वरुपात ह्या उपक्रमांना हातभार लावावा असे आवाहन रोटरी क्लब चे अध्यक्ष रोटे मंगेश अपशंकर यांनी केले आहे.