पिंपळगाव नाकविंदा ग्रामपंचायत निवडणूकीची रणधुमाळी

सरपंच पदासह सोळा उमेदवार रिंगणात.
अकोले/प्रतिनिधी –
अकोले तालुक्यातील पिंपळगाव नाकविंदा येथील ग्रामपंचायत निवडणूक होत आहे निवडणुकीत तिन प्रभाग आहेत.या निवडणूकीत सर्व प्रभाग हे बिनविरोध व्हावे यासाठी अनेकांची इच्छा होती.परंतु निवडणूक बिनविरोध होण्याचे स्वप्न अखेर च्या दिवशी मावळले आहे.
तिनही प्रभागांमध्ये सरपंच पदासह सोळा उमेद् वार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.यामध्ये प्रत्येक प्रभागातून एक असे तिन उमेद वारांची बिनविरोध निवड झाली आहे.
या निवडणूकीसाठी तिनही प्रभागातून संरपंच पदासाठी अनुसूचीत जमातीचे आढळ विठ्ठल चंद्रकांत,मेंगाळ रमेश लक्ष्मण तसेच सोंगाळ लक्ष्मण किसन असे तिन उमेदवार प्रतिस्पर्धी आहेत.
त्याचप्रमाणे सदस्य पदासाठी प्रभाग क्रमांक १ मध्ये सर्वसाधारण स्त्री उमेद्वार बोऱ्हाडे आशाबाई माधव व लगड सुरेखा रविंद्र तर अनुसूचीत जमातीमधुन मेंगाळ गणेश नारायण व मेंगाळ शिवराम सखाराम,
प्रभाग क्रमांक २ मध्ये सर्वसाधारण स्त्री उमेद्वार आभाळे अलका गोरक्ष,बगनर संगिता भाऊपाटील व लगड उज्वला वाळीबा तर अनुसूचीत जमातीमधून तातळे कैलास धर्मा व मेंगाळ चिमण नाथू,
प्रभाग क्रमांक ३ मध्ये सर्वसाधारण प्रवर्गातून काळे मारूती रामभाऊ व लगड वाळीबा लक्ष्मण तर अनु.जातीमधून गायकवाड अमोल अशोक व जाधव नवनाथ नारायण याप्रमाणे सोळा उमेद्वार निवडणूक रिंगणात आहेत.
तर प्रत्येक प्रभागांमधून मेंगाळ रखमाबाई नाथु,आढळ सुमन सदु व सोंगाळ सविता नामदेव यांची बिनविरोध निवड झाली आहे.एकूण नऊ सदस्यांपैकी तिन बिनविरोध म्हणजेच सहा सदस्य व एक सरपंच असे सात उमेद्वार निवडायचे आहेत.प्रत्येक प्रभागांमध्ये एका मतदाराला तिन मते देण्याचा अधिकार असेल.यापैकी प्रभाग क्रमांक दोनमध्ये लगड उज्वला वाळीबा या उमेद्वाराने निवडणूक लढवायची नसल्याने मतदारांनी उमेद्वारी ग्राहय धरू नये असे जाहिर आवाहन केले आहे.
महालक्ष्मी मातेला नारळ वाढवून प्रचाराला सुरूवात झाली आहे.सदर निवडणूक ही तालुक्यासह सर्वांसाठी लक्षवेधी निवडणूक ठरणार असल्याची चर्चा होत आहे.