इतर
भातकुडगाव फाटा चौफुल्यावर साखळी उपोषणाचा दुसरा दिवस

आरक्षण प्रश्नी शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा – चंद्रशेखर घुले पाटील
शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
मराठाआरक्षणाचा प्रश्न गांभीर्याने घेऊन यावर शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा. चार दशकापेक्षाही अधिक काळ मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे या प्रश्नावर संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजामध्ये जागृती करून या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधले असले तरी शासनाने लवकरात लवकर या प्रश्नावर निर्णय घ्यावा.व मराठा समाजाला न्याय द्यावा असे मत शेवगाव -पाथर्डीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी मांडले.
आपण मराठा आरक्षण प्रश्नी समाज बांधवाबरोबर आहोत व आपला मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेल्या साखळी उपोषणाला पाठिंबा आहे.
शेवगाव -नेवासा राजमार्गावरील भातकुडगाव फाटा चौफुल्यावर कामधेनु पतसंस्थेच्या समोरील प्रांगणात सकल मराठा समाजाच्या वतीने संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या आवहानानुसार साखळी उपोषणाची सुरुवात करण्यात आली. साखळी उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशीही या ठिकाणी अनेकांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला यावेळी अंतरवाली सराटी येथे १७ दिवसाच्या उपोषणा नंतर शासनाला दिलेल्या चाळीस दिवसाची मुदत संपली. तरीही मराठा आरक्षणावर कुठलाही निर्णय न झाल्याने संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा अन्न पाणी त्याग करून आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी व मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. या उपोषणामध्ये सर्वस्वी जोहरापूरचे माजी सरपंच अशोक देवढे, भायगावचे सरपंच राजेंद्र आढाव, भातकुडगावचे माजी सरपंच शंकरराव नारळकर, प्रहाराचे तुकाराम शिंगटे, प्रहारचे तालुका अध्यक्ष रामभाऊ शिदोरे, कामधेनु पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब काळे, शेतकरी बचाव जन आंदोलन समितीचे अध्यक्ष एकनाथ काळे जलभूमीचे बाळासाहेब जाधव उपस्थित आहेत.
यावेळी परिसरातील भाजपा प्रदेश सचिव अरुण मुंडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मच्छिंद्र आर्ले, भातकुडगाव मंडलाधिकारी बी.ई.मंडलिक, सुनिल लवांडे, शिवसंग्राम पक्षाचे जिल्हा सरचिटणीस संदीप बामदळे, सतिषराव पवार, मुकुंद जमधडे,संदिप खरड, दिपक वाबळे अमोल रसाळ शेखर खंडागळे ( बारामती ) अशोक गायकवाड ( शिरूर कासार ) बबन जाधव हरिचंद्र जाधव चंदु फटांगरे बाबासाहेब साबळे, देवदान वाघमारे, शिवाजी उभेदळ, पांडुरंग गायकवाड बापुसाहेब पानसंबळ, राजेश लोढे,अशोक काळे, गणेश देशमुख, गणेश शिंदे, मारुती सामृत, जालीदर सामृत आदींनी उपस्थित राहून पाठिंबा दिला आहे.
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी वअंतरवाली सराटी येथुन मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार साखळी उपोषणाचे रूपांतर दिनांक २९ / १० / २०२३ पासुन अमर उपोषणात करण्यात येणार आहे. त्यानुसार भातकुडगाव फाटा येथे चालू असलेल्या साखळी उपोषणाचे रूपांतर आमरण उपोषणा करण्यात येणार आहे. त्यामध्ये जोहरापुरचे माजी सरपंच अशोक महादेव देवढे व भायगावचे सरपंच राजेंद्र रामराव आढाव आमरण उपोषणास बसणार आहे.