
दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील जातेगाव विकास सेवा सहकारी संस्थेवर माजी सरपंच विठ्ठलराव पोटघन यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आली असून संस्थेच्या चेअरमनपदी दत्तात्रय ढोरमले ,व्हाइस चेअरमनपदी सुभाष ढोरमले यांची बिनविरोध निवड झाली.
निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत चेअरमन पदासाठी दत्तात्रय ढोरमले तर व्हा. चेअरमन पदासाठी सुभाष ढोरमले यांचे प्रत्येकी एकेक अर्ज आल्याने त्यांची निवड करण्यात आली.
या वेळी पॅनल प्रमुख विठ्ठलराव पोटघन यांच्यासह नवनिर्वाचित सदस्य रघुनाथ पोटघन, भानुदास पोटघन,
छबूशेठ फटांगडे, भाऊसाहेब गायकवाड ,महिला सदस्य छबुबाई ढोरमले, विजया ढोरमले, सरपंच संजय गायकवाड, सचीन ढोरमले गणेश ढोरमले, पांडुरंग ढोरमले, गणेश वाखारे, संजय ढोरमले, सुनिता
पोटघन , संजय कराळे चंद्रकांत ढोरमले, सौरभ पोटघन, बाळू ढोरमले उपस्थित होते
जातेगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या सभासदांनी व ग्रामस्थांनी आमच्यावर विश्वास टाकत जबाबदारी दिली ती खंबीरपणे पार पाडत सर्व सभासदांना न्याय देत संस्थेचे व सभासदांचे हित जोपासण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे.असल्याचे नूतन चेअरमन दत्तात्रय ढोरमले , व्हा.चेअरमन सुभाष ढोरमले यांनी सांगितले