अनुदानित आश्रम शाळा सामोडे येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

सामोडे प्रतिनिधी:
महात्मा फुले विद्याप्रसारक संस्था पिंपळनेर संचलित अनुदानित आश्रमशाळा सामोडे येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अँड संभाजी पगारे तर प्रमुख पाहुणे म्हणून संचालक विजयराव सोनवणे, उपाध्यक्ष स्वप्निल पगारे,शाळेचे मुख्याध्यापक उमेश माळी प्राचार्य मनेष माळी वि.जा.भ.ज.आश्रमळाचे मुख्याध्यापक एस.बी.मोरे हे होते.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
विद्यार्थी व विद्यार्थीनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित विविध प्रसंग नाट्य अभिनयातून सादरीकरण केले. संचालक विजयराव सोनवणे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर माहिती दिली.
अॅड संभाजी पगारे यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांच्या मनात थोर महापुरुषांच्या विचारांना रुजवायला अभिनयुक्त सादरीकरण वकृत्वापेक्षा प्रभावी ठरेल हा माझा विचार आपण प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिल्या बद्दल शाळेची प्रशंसा केली.कार्यक्रमाची प्रास्ताविक उमेश माळी यांनी तर सूत्रसंचालन प्रा विजय ठाकरे यांनी केले.आभारप्रदर्शन प्रा.प्रवीण पगारे यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख गणेश भावसार यांच्या सह विद्यार्थी वेशभूषा साठी व नाट्य सादरीकरणासाठी सर्वच शिक्षक,शिक्षिका,व चतर्थ कर्मचारी प्रयत्नशील होते