श्रीवर्धन , म्हसळा तालुक्यात मराठा आरक्षण साठी साखळी उपोषनाला प्रतिसाद!

संदीप लाड
श्रीवर्धन प्रतिनिधी :
मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला श्रीवर्धन म्हसळा तालुक्यातील मराठा समाजाचा पाठींबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण मराठा भवनाच्या प्रांगणात करण्यात आले. सदरच्या साखळी उपोषणात मराठा समाजाच्या सर्व घटकांनी सहभाग नोंदवल्याचे दिसून आले.
श्रीवर्धन तहसीलदार महेंद्र वाकलेकर, पोलीस निरीक्षक उत्तम रिकामे यांनी उपोषण स्थळी जाऊन उपोषण कर्त्यांची भेट घेतली.सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार महेंद्र वाकलेकर यांच्या कडे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा असल्याचे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.सदरच्या निवेदनातं पुढील मुद्दे माडण्यात आले.मराठा समाज आपल्या न्याय मागणीसाठी गेली अनेक वर्ष लढा देत आहे.मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या. मनोज जरांगे पाटील यांनी सरकार ला ४० दिवसाची मुदत दिली होती मात्र सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यात चाल ढकल करत आहे.
मराठा समाज शांतता प्रिय समाज आहे.समाजाने लाखोचे मोर्चे अतिशय शांततेत काढले मात्र सरकारने दखल घेतली नाही. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला आमचा पाठींबा आहे.महाराष्ट्र सरकारने योग्य निर्णय घेऊन मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्यावे.असे निवेदनात करण्यात आले आहे.उपोषणात सकल मराठा समाजाचे वसंत यादव,प्रदीप राऊत,सुजित तांदळेकर,दत्ताजी सुर्वे,किशोर राऊत , सुनील ठाकूर, व इतर समाज घटक उपस्थित होते
मराठा समाजाचे म्हणणे शासन दरबारी कळविले जाईल.समाजाने शांततेत साखळी उपोषण केले….
महेंद्र वाकलेकर (तहसीलदार श्रीवर्धन )