इतर

भातकुडगाव फाटा येथील आमरण उपोषणसह साखळी उपोषण स्थगित


शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठीसकल मराठा समाजाच्या वतीने शेवगाव – नेवासा राजमार्गावरील भातकुडगाव फाटा चौफुल्या वरील कामधेनु पतसंस्थेच्या प्रांगणात भायगावचे सरपंच राजेंद्र आढाव व जोहरापूरचे माजी सरपंच अशोक देवढे यांनी आमरण उपोषणाच्या सहाव्या दिवशी तर साखळी उपोषणाच्या नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार उपोषण स्थगित केले.शासनाच्या वतीने अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण नवव्या दिवशी सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत २४ डिसेंबर २०२३ पर्यंत मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल. या आश्वासनानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केले.व त्यानंतर महाराष्ट्रातील चालू असलेल्या उपोषणकर्त्यांना त्यांनी आवाहन करून उपोषण स्थगित करण्याचे आदेश दिले. त्याच आदेशानुसार शेवगाव – पाथर्डीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील व शेवगावचे तहसीलदार प्रशांत तांगडे यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन उपोषण स्थगित केले. यावेळी जनशक्ती विकास आघाडीचे अॅड. शिवाजीराव काकडे, भाजपाचे ज्येष्ठ नेते दिनेशजी लव्हाट, प्रहारचे तालुका अध्यक्ष रामजी शिदोरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मच्छिंद्र आर्ले, शेतकरी बचाव जन आंदोलनाचे अध्यक्ष एकनाथ काळे, कामधेनुचे चेअरमन बाळासाहेब काळे, भातकुडगावचे माजी सरपंच शंकरराव नारळकर,जलभूमीचे बाळासाहेब जाधव, कृषी उत्पन्नाचे उपसभापती गणेश खंबरे यावेळी उपस्थित होते.
यावेळी भातकुडगावचे माजी सरपंच राजेश फटांगरे, सुभाष पवार,भायगावचे माजी सरपंच अशोक दुकळे, भातकुडगावचे विद्यमान सरपंच अशोक वाघमोडे, उपसरपंच विठ्ठल फटांगरे, विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष सचिन फटांगरे, भायगाव विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष कल्याणराव आढाव, दहिगाव -नेचे उपसरपंच राजाभाऊ पाऊलबुद्धे, बाबासाहेब माळवदे, भगवान आढाव, तुकाराम शिंगटे, कडूबाळ घुले,पत्रकार शहराम आगळे, गणेश शिंदे, शंकर मरकड, दादासाहेब डोंगरे, रामनाथ रुईकर,संजय डोंगरे, सखाराम लव्हाळे, अण्णासाहेब दुकळे, चंदू फटांगरे, कैलास लांडे, कानिफनाथ घाडगे, सुभाष काळे,भाऊराव फटांगरे, देवदान वाघमारे, तारामती दिवटे, विठ्ठल रमेश आढाव, दादासाहेब देवढे,अनिल लांडे, संकेत शिदोरे, हरिचंद्र जाधव व संजय फाटके यांनी उपोषण काळात विशेष योगदान दिले. यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.


आपण आपल्या समाजाचे काहीतरी देणे लागतो. याच स्वच्छ भावनेतून सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे. यासाठी संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या आवहानाला प्रतिसाद म्हणून भायगावचे सरपंच राजेंद्र आढाव व जोहरापूरचे माजी सरपंच अशोक देवढेआम्ही उपोषणास बसलो होतो व या पुढील काळात मराठा आरक्षण मिळेपर्यंत आपण मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाचे पालन करून या लढ्यात सहभागी राहणार आहोत.मनोज जरांगे पाटील यांचा हा लढा भविष्यात मराठ्यांच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहला जाईल. असेच काम त्यांच्या हातून हो ही सदिच्छा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button