आजचे पंचांग व राशिभविष्य दि.२२/०७/२०२४

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- आषाढ ३१ शके १९४६
दिनांक :- २२/०७/२०२४,
वार :- इंदुवासरे(सोमवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:०५,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०७:०६,
शक :- १९४६
संवत्सर :- क्रोधी
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- वर्षाऋतु
मास :- आषाढ
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- प्रतिपदा समाप्ति १३:१३,
नक्षत्र :- श्रवण समाप्ति २२:२१,
योग :- प्रीति समाप्ति १७:५८,
करण :- तैतिल समाप्ति २३:४९,
चंद्र राशि :- मकर,
रविराशि – नक्षत्र :- कर्क – पुष्य,
गुरुराशि :- वृषभ,
शुक्रराशि :- कर्क,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- उत्तम दिवस,
✿राहूकाळ:- सकाळी ०७:४३ ते ०९:२० पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
अमृत मुहूर्त — सकाळी ०६:०५ ते ०७:४३ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी ०९:२० ते १०:५८ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०३:५१ ते ०५:२९ पर्यंत,
अमृत मुहूर्त — संध्या. ०५:२९ ते ०७:०६ पर्यंत,
❀ दिन विशेष:-
अशून्यशयनव्रत, सिंहायन १३:१४, इष्टि, अमृत २२:२१ प., व्दितीया श्राद्ध,
————–
🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾
आजचा दिवस सुखाचा जावो मन प्रसन्न राहो!!!!!
💐🌺🌼🌹🌾🍀🌻🌷🌸
🌏 दैनिक राशीभविष्य 🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- आषाढ ३१ शके १९४६
दिनांक = २२/०७/२०२४
वार = इंदुवासरे(सोमवार)
मेष
कामातील उत्साह वाढीस लागेल. लहान-सहान गोष्टींवरून चिडू नका. बौद्धिक कामात अधिक कष्ट पडतील. घरातील गोष्टींबाबत अधिक दक्ष राहाल. आततायीपणे कोणतीही गोष्ट करू नका.
वृषभ
सामाजिक गोष्टींची जाणीव मनात जागृत ठेवायला हवी. जवळचे मित्र भेटतील. कामाच्या ठिकाणी सुलभता लाभेल. धडाडीपणावर संयम ठेवा. चर्चेला अधिक महत्त्व द्या.
मिथुन
गोड बोलण्यातून छाप पाडाल. कामातून अनपेक्षित लाभ मिळेल. घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन कामाला निघावे. व्यापारी वर्गाला लाभ मिळतील. मित्रांशी सुसंवाद ठेवावा.
कर्क
व्यावसायिक स्तरावरील बदल लक्षात घ्या. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. कष्ट अधिक वाढू शकतात. व्यापार्यांनी अधिक मेहनत घ्यावी. कौटुंबिक जबाबदारी लक्षात घ्या.
सिंह
नवीन प्रयोगाला यश येईल. आपले मत अधिक स्पष्टपणे मांडाल. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. वरिष्ठांना नाराज करू नका. त्यांचा दबदबा वाढेल.
कन्या
कष्टाला पर्याय नाही. झोपेची तक्रार जाणवेल. मन काहीसे विचलीत राहील. मनातील इच्छा अधिक तीव्र होईल. महत्त्वाच्या नोंदी ठेवाव्यात.
तूळ
नवीन विचार आत्मसात कराल. कलेला अधिक प्रोत्साहन मिळेल. जोडीदाराचा वरचष्मा राहील. अधिकारी वर्गाचा पाठिंबा मिळेल. मित्रांशी पैज लावाल.
वृश्चिक
कौटुंबिक वातावरण चांगले राहील. वक्तव्य विचारपूर्वक करावे. तुमचा सल्ला विचारात घेतला जाईल. विरोधक शांत राहतील. सरकारी कामे पुढे सरकतील.
धनू
जवळचा प्रवास करता येईल. भावंडांची मदत मिळेल. रागाला आवर घालावी लागेल. गुंतवणूक करताना सावधानता बाळगावी. मनापासून जबाबदार्या पार पाडाल.
मकर
दिवस शांततेत जाईल. विचारांना योग्य गती द्या. उत्साहवर्धक व सकारात्मक दिवस. आध्यात्मिक प्रगती कराल. जोडीदाराची योग्य साथ मिळेल.
कुंभ
मनाची चंचलता जाणवेल. अचानक लाभाची शक्यता. हातातील कामात घाई करू नका. भौतिक सुखात वाढ होईल. स्थावरच्या व्यवहारातून लाभ होईल.
मीन
मानसिक व्यग्रता जाणवेल. व्यावसायिक लाभावर लक्ष केन्द्रित करावे. अनाठायी खर्चाची शक्यता. प्रेमातील व्यक्तींनी आज सबुरी बाळगावी. राजकारणात पडू नका.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर