इतर

आजचे पंचांग व राशीभविष्य

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- कार्तिक १५ शके १९४५
दिनांक :- ०६/११/२०२३,
वार :- इंदुवासरे(सोमवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:३२,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०५:५३,
शक :- १९४५
संवत्सर :- शोभन
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- शरदऋतु
मास :- अश्विन
पक्ष :- कृष्षपक्ष
तिथी :- नवमी समाप्ति २९:५१,
नक्षत्र :- आश्लेषा समाप्ति १३:२२,
योग :- शुक्ल समाप्ति १४:२५,
करण :- तैतिल समाप्ति १६:३४,
चंद्र राशि :- कर्क,(१३:२२नं. सिंह),
रविराशि – नक्षत्र :- तुला – स्वाती,
गुरुराशि :- मेष,
शुक्रराशि :- कन्या,
राशिप्रवेश :- बुध – वृश्चिक,
शुभाशुभ दिवस:- चांगला दिवस,

✿राहूकाळ:- सकाळी ०७:५७ ते ०९:२२ पर्यंत,

लाभदायक वेळा
अमृत मुहूर्त — सकाळी ०६:३२ ते ०७:५७ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी ०९:२२ ते १०:४७ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०३:०३ ते ०४:२८ पर्यंत,
शुभ मुहूर्त — संध्या. ०४:२८ ते ०५:५३ पर्यंत,

❀ दिन विशेष:
विशाखा रवि २६:४०,
————–

🌏 दैनिक राशीभविष्य 🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- कार्तिक १५ शके १९४५
दिनांक = ०६/११/२०२३
वार = इंदुवासरे(सोमवार)

मेष
बोलक्या स्वभावाचा फायदा होईल. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल. नातेवाईकांची एखादी कृती मन खिन्न करू शकते. सासरच्या व्यक्तींकडून सहकार्य मिळेल. वाहन चालवताना खबरदारी घ्यावी.

वृषभ
उत्तम प्रशासक बनाल. आपला सन्मान वाढेल. लहान आजारांकडे दुर्लक्ष करू नका. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना चांगला दिवस. बोलताना तारतम्य बाळगा.

मिथुन
सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. अति धाडस करू नका. कामात दुर्लक्ष करू नका. हातातील काम व्यवस्थित पूर्ण होईल. मित्रांशी असलेले नाते घट्ट होईल.

कर्क
अविचाराने पैसा खर्च करू नका. बाजू मांडून गैरसमज दूर करा. घरातील वातावरण खेळकर राहील. मन विचलीत होण्यापासून थांबवा. विरोधक पराभूत होतील.

सिंह
अचानक प्रवास करावा लागेल. हवे असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. आपला प्रभाव वाढेल. हातातील कलेचे कौतुक केले जाईल. छोटे प्रवास लाभदायक ठरतील.

कन्या
नवीन उधारी देऊ नका. व्यवसायात कोणाच्याही बोलण्यावर संपूर्ण विश्वास ठेऊ नका. ग्रहमानाचे पाठबळ लाभेल. चांगल्या गोष्टीसाठी खर्च केला जाईल. प्रलंबित येणी प्राप्त होतील.

तूळ
सर्वांशी गोड बोलून कार्यभाग साधाल. अति तिखट पदार्थ खाणे टाळावे. जमिनीचे व्यवहार पूर्ण कराल. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल. प्रयत्नात सकारात्मकता दिसून येईल.

वृश्चिक
घरातील मोठ्यांचा आदर करावा. स्पर्धेत यश मिळेल. मनातील विचारांना योग्य दिशा द्या. मानसिक शांतता जपावी. मौल्यवान वस्तु खरेदी केल्या जातील.

धनू
आपल्या बोलण्यावर संयम ठेवा. व्यावसायिक ठिकाणी प्रशंसा केली जाईल. नियोजित कामे पूर्णत्वास जातील. मित्रांची मदत घ्याल. अति विचार करू नका.

मकर
जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. विद्यार्थ्यांचा उत्साह वाढीस लागेल. हातातील काम पूर्णत्वास जाईल. वरिष्ठांची मदत मिळेल. मनोरंजनात वेळ घालवाल.

कुंभ
नियोजनबद्ध कामे केली जातील. समोरील कामाकडे अधिक लक्ष द्यावे. हातातील संधी सोडू नका. आहारावर नियंत्रण हवे. वादाच्या मुद्यांपासून दूर राहावे.

मीन
शांत राहून कामे करावीत. आततायीपणे कोणतीही कृती करू नका. सामाजिक क्षेत्रात कौतुक केले जाईल. सन्मानात वाढ होईल. भडक डोक्याने वागू नका.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button