असंघटित कंत्राटी कामगारांची कणकवली येथे बैठक संपन्न

सिंधुदुर्ग दि २९
सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय मजदूर संघांचे पदाधिकारी इतर असंघटित कंत्राटी कामगारांची ची कणकवली येथे बैठक ,संपन्न झाली
भारतीय मजदूर चे सिंधुदुर्ग जिल्हा मधील कामकाज व महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ ची जिल्हा आंदोलन, ई ऐस आय च्या बाबतीतील समस्या , कामगारांचा झालेल्या अपघात , ई ऐस आय कार्यालय च्या वतीने देय असणारे फायदे ई समस्या बाबतीत सविस्तर चर्चा यावेळी झाली, या समस्या बाबतीत लवकरच न्याय मिळवून देण्यासाठी निर्धार व्यक्त केला. या वेळी महाराष्ट्र विज कामगार महासंघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे, कोकण विभाग संघटन मंत्री श्री हरी चव्हाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार सिंधुदुर्ग उपाध्यक्ष श्री लोकेश सांगवेकर, राजू दळवी यांनीउपस्थितांचे महावितरण कंत्राटी कामगारांच्या वतीने स्वागत केले.
या बैठकीस भारतीय मजदूर संघ सिंधुदुर्ग जिल्हा पदाधिकारी श्री विकास गुरव -अध्यक्ष श्री सत्यविजय जाधव – सचिव ,श्री भगवान साटम – कार्याध्यक्ष श्री ओमकार गुरव – संघटनमंत्री सौ अस्मिता तावडे – प्रदेश सदस्य श्री राजेंद्र आरेकर उपाध्यक्ष श्री हेमंतकुमार परब – आदी सदस्य उपस्थित होते
यावेळी कोल्हापूर येथे महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे केंद्रीय उपाध्यक्ष श्री अमर लोहार व कोल्हापूर सर्कल चे उपाध्यक्ष श्री राहूल भालबर यांच्या समावेत कोल्हापूर मधील कंत्राटी कामगारांचे विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.