इतर
कोतुळ येथील काशीनाथ पोखरकर यांचे निधन

कोतुळ (प्रतिनिधी)-
तालुक्यातील कोतूळ येथील रहीवासी , जुन्या पिढीतील शेतकरी काशीनाथ भाऊराव पोखरकर (वय -94) यांचे सोमवारी (13 नोव्हेंबर) सकाळी 9.15 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी हौसाबाई, पाच मुले, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे सेवानिवृत्त सरव्यवस्थापक भानुदास पोखरकर, सुभाष पोखरकर ,अकोले तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजयराव पोखरकर, निवृत्त कृषी पर्यवेक्षक सुरेश पोखरकर, मुंबईस्थित अभियंता रमेश पोखरकर व अमरावती येथील जीएसटी विभागातील उपायुक्त संजय पोखरकर यांचे वडील व निवृत्त मुख्याध्यापिका शैलजा पोखरकर व अनुराधा पोखरकर यांचे सासरे होत.
अकोले येथील अमरधाम मध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.