चंद्रकिरण मंडळ तळेगाव या संस्थेचा पुनव या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा

पुणे–दि.१० नोव्हेंबर २०२३, धनत्रयोदशी दिवशी चंद्रकिरण काव्यमंडळाचा दिवाळी प्रभात हा कार्यक्रम इनरव्हील क्लब ऑफ तळेगांव दाभाडे येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
संस्थेच्या सौ. विजयाताई शुक्ल यांनी ईशस्तवन करुन ह्या कार्यक्रमाची मधुरतम प्रसन्न वातावरणात सुरवात झाली.
Innerwheel च्या अध्यक्षा सौ संध्या थोरात ह्यांनी थोडक्यात आपले विचार मांडले.
*यावेळी तळेगाव येथील ख्यातनाम अशा चंद्रकिरण काव्य मंडळातील 12 मान्यवर कवींच्या *पुनव कवीतांचा* प्रातिनिधिक काव्य संग्रहाचे प्रकाशन प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक भावकवी , व्याख्याते व महाकवी कालिदास प्रतिष्ठान ( महाराष्ट्र ) चे संस्थापक अध्यक्ष मा.श्री. वि. ग. सातपुते, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष साप्ताहिक अंबरचे संस्थापक पं. मा. सुरेशजी साखवळकर यांच्या हस्ते पार पडले.
या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून कलापिनीचे प्रमुख विश्वस्त डॉ. अनंत परांजपे, कलापिनीच्या कार्याध्यक्षा सौ अंजलीताई सहस्त्रबुध्दे व सिध्दहस्त्त लेखक प्रा. जयंत जोर्वेकर उपस्थित होते.
सौ. अर्चना मुरुगकरांनी, पंडित सुरेशजी साखवळकर आणि मा,.श्री वि.ग .सातपुते, यांचा परिचय करुन दिला.
पं. सुरेशजी साखवळकर यांनी आपल्या भाषणात कवी कुलगुरू कालिदास यांनी शाकुंतल हे नाटक पद्यात लिहिले. काव्य, नाट्य, कला यातून जीवन घडते, समृद्ध होते असे सांगितले. तर डॉ. अनंत परांजपे यांनी काव्य लेखना बरोबरच त्या काव्याचे सादरीकरण उठावदार असणे महत्वाचे असल्याचे सांगितले.
प्रा. जयंत जोर्वेकर सरांनी शब्दात काय ताकद असते,शब्द काव्यात कसा चपखल बसायला हवा,शब्दफेक कशी असते, शब्दाचा अर्थ श्रोत्यांपर्यन्त कसा पोहोचतो या बद्दल कविश्रेष्ठ कै. कुसुमाग्रजांच्या ओळी घेवून मार्गदर्शन केले.
पुनव काव्यसंग्रहाच्या कवींनी त्यांच्या काव्यरचना प्रथम सादर केल्या, मग मेढीकाकांनी गणेशवंदना गायली …नंतर कार्याध्यक्षा सौ नंदिनीजींनी त्यांची गझल उत्तम सादर केली,त्यानंतर चंद्रकिरणच्या सर्व कवींनीही त्यांच्या कविता सादर केल्या…
ह्या कार्यक्रमासाठी सौ माधवी खडक्कार, श्रीराम घडे , रमेश मुरूगकर आणि श्रीकान्त पेंडसे , ह्यांनी बहुमोल हातभार लावला ह्या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ चितारणा-या सौ.दामिनी खडक्कार पत्कींचा आणि मुद्रक श्री प्रसाद मुंगींच्या पत्नी, सौ कल्याणी यांचा सत्कार करण्यात आला…
चंद्रकिरण मंडळाचे विद्यमान अध्यक्ष मा. सतीश साठे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले आणि मग त्यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भावकवी श्री. वि. ग. सातपुते ( आप्पा ) ह्यांनी त्यांच्या व्याख्यानातून आपले जीवनानुभव आणि आपल्याला लाभलेल्या साहित्यिकांच्या सहवासातून आपले घडलेले जीवन आणि अनुभूती आपल्या ओघवत्या शब्दातून “काव्य म्हणजे साहित्यातील सर्वश्रेष्ठ प्रकार असून कविता करता येत नसते तर कविता ही जन्मावी लागते हा मूलभूत विचार व्यक्त करुन, “आई ” ह्या गाजलेल्या भावकवितेने, ह्या सुंदर नि आटोपशीर कार्यक्रमाची सांगता केली….
या साहित्यिक मनोमिलनाच्या सुंदर कार्यक्रमात प्रीतीभोजनाचा आस्वाद…! दिलखुलास गप्पा मारत मंत्रमुग्ध वातावरणात रसिकांनी एका सुंदर मैफिलीचा निरोप घेतला…
सौ रश्मी थोरात कार्यवाह चंद्रकिरण काव्यमंडळ तळेगाव दाभाडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले..