देवठाण च्या ग्रामसभेत,अवैध धंदे बंद करण्याची मागणी !पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संताप

पोलिसांच्या कार्यपद्धतीवर ग्रामस्थांचा संताप
अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील देवठाण येथील ग्रामसभा
आज दिनांक 13/2/23 रोजी पडली ग्रामसभेत गावातील दारूबंदी केले अशी मागणी करीत पोलिसांच्या कार्यपद्धती बाबत संताप व्यक्त करण्यात आला
गेल्या 6 महिन्यापासून देवठाण गावात प्रचंड प्रामाणात गल्ली बोळात, दारू विक्री केंद्र सुरू झालेले आहे तसेच शालेय परिसरातच,चक्री, जुगार मटका, खेळला जातो त्यामुळे शालेय विद्यार्थी ,महिला व ग्रामस्थ ह्यांना ह्या गोष्टीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे
बीट पोलीस यांचे कडे वारंवार तक्रार करूनही, दखल घेतली जात नाही पोलीस या कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात असा असा आरोप ग्रामस्थानी यावेळी केला
बीट पोलीस अनेक वेळा आरोपीला पकडून नेल्यावर लगेच पंचनामा करत नाही गुन्हा दाखल करत नाही। आरोपींकडून चिरीमिरी घेऊन आरोपीला लगेच सोडून देतात त्यामुळे ह्या आरोपिंचे पुन्हा धाडस वाढले असून।ते पुन्हा अवैध धंदे सुरू ठेवतात पोलिसांच्या आशीर्वादानेच हे अवैध दारू धंदे सुरू असल्याचा आरोप ग्रामसभेत करण्यात आला
यावेळी ग्रामसभेत दारुबंदी कमेटी स्थापन करण्यात आली
उपसरपंच आनंदा गिर्हे ह्यांनी ग्रामसभेत सांगितले आहे की, ह्यासाठी मी स्वतः पुढाकार घेणार आहेत व दारूबंदी कमिटी व सजग नागरिक त्यांना मदत करणार आहे बीट पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत
पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी लक्ष देऊन गावातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी देवठाण ग्रामस्थ यांनी केली आहे।
याप्रसंगी देवठाण गावचे सरपंच निवृत्ती जोरवर,उपसरपंच आनंदा गिर्हे,माजी पंचायत समिती सदस्य अरुण शेळके, अगस्ती सहकारी साखर कारखाना संचालक सुधीर शेळके, शिवाजी पाटोळे,पंचायत समिती चे माजी सभापती सुहास शेठ कर्डीले,सोसायटीचे चेअरमन पंढरीअप्पा शेळके,परशराम शेळके,रवी गायकवाड सर, जालिंदर बोडके,श्रीकांत सहाणे,सुभाष सहाणे ,प्रकाश शेळके ,दिनेश बोडके,सुनील सहाणे,कॉम्म्रेड तुळशिराम कातोरे ,पांडू मेंगाळ आदी मोठया संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते