आजचे पंचांग व राशिभविष्य दि १९/११/२०२३

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- कार्तिक २८ शके १९४५
दिनांक :- १९/११/२०२३,
वार :- भानुवासरे(रविवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:३९,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०५:५०,
शक :- १९४५
संवत्सर :- शोभन
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- शरदऋतु
मास :- कार्तिक
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- षष्ठी समाप्ति ०७:२४, सप्तमी २९:२२,
नक्षत्र :- श्रवण समाप्ति २२:४८,
योग :- वृद्धि समाप्ति २३:२८,
करण :- गरज समाप्ति १८:२४,
चंद्र राशि :- मकर,
रविराशि – नक्षत्र :- वृश्चिक – विशाखा,
गुरुराशि :- मेष,
शुक्रराशि :- कन्या,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- क्षयदिन वर्ज्य दिवस,
✿राहूकाळ:- संध्या. ०४:२६ ते ०५:५० पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०९:२७ ते १०:५१ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी १०:५१ ते १२:१४ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०१:३८ ते ०३:०२ पर्यंत,
❀ दिन विशेष:
भानुसप्तमी, कल्पादि, भद्रा २९:२२ नं.,
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- कार्तिक २८ शके १९४५
दिनांक = १९/११/२०२३
वार = भानुवासरे(रविवार)
मेष
बोलताना आपला मुद्दा स्पष्ट मांडा. रचनात्मक कार्याची चुणूक दाखवा. विवाहाची बोलणी पुढे सरकतील. प्रेम सौख्यात वाढ होईल. घरगुती वातावरण आनंदी असेल.
वृषभ
आपले मानसिक आरोग्य बिघडवू नका. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या. स्थावर मालमत्तेतून लाभ संभवतो. दिवस आपल्या आवडी प्रमाणे घालवा. कुटुंबातील सदस्य चांगल्या बातम्या देतील.
मिथुन
खेळ व कला यांमध्ये वर्चस्व राहील. अनपेक्षित खर्च सामोरी येतील. मानसिक सौख्याला प्राधान्य द्या. व्यापारी वर्गाने भागीदारीकडे अधिक लक्ष द्यावे. पित्त प्रकृतीत वाढ संभवते.
कर्क
आपले हितचिंतक पारखून घ्या. डोळे झाकून कुणावरही विश्वास ठेवू नका. प्रलंबित येणी वसूल होऊ शकतील. काही परिवर्तन सकारात्मक ठरतील. घरात टापटीप ठेवाल.
सिंह
आपली स्वप्ने सत्यात उतरतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. प्रिय व्यक्तीच्या भावनांचा आदर करा. कामे मनाजोगी पार पडतील.
कन्या
घरामध्ये शांतता नांदेल. दिवस आनंदात जाईल. अधिक ऊर्जा व उत्साहाने कामे कराल. कामातील बदल आनंद देईल. मन प्रसन्न राहील.
तूळ
आपल्या स्वत:साठी काही खर्च कराल. हितशत्रू कडे दुर्लक्ष करू नका. मानसिक आरोग्य जपावे. खर्चाचा ताळमेळ साधावा. व्यसनाच्या आहारी जाऊ नका.
वृश्चिक
आपल्याच मतावर अडून राहाल. चारचौघांत कौतुक होईल. आवडत्या व्यक्तीची साथ मिळेल. तुमचा रूबाब वाढेल. स्वत:चे स्वत्व जपण्याचा प्रयत्न कराल.
धनू
आरोग्याच्या तक्रारींकडे लक्ष द्या. मोहाला बळी पाडू नका. कामातून आनंद शोधाल. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद संभवतात. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा.
मकर
जिद्द व चिकाटी सोडू नका. जुगारात धनलाभ संभवतो. विवाहाचे प्रस्ताव पुढे येतील. व्यापारातील नवीन गुंतवणूक लाभदायक ठरेल. नोकरीमध्ये कामाकडेच पूर्ण लक्ष द्या.
कुंभ
खरेदीचे निर्णय लांबणीवर टाकाल. व्यवहारात गल्लत करू नका. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. घरातील वातावरण सकारात्मक असेल. चांगल्या गोष्टीसाठी पैसे खर्च कराल.
मीन
प्रलंबित येणी मिळतील. रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. कामानिमित्त प्रवास घडेल. व्यापारात नवीन धोरण ठरवाल. ध्येयाचा पाठलाग करा.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर