नेप्ती येथे श्रीराम पालखी सोहळा उत्साहात

अहमदनगर–नगर तालुक्यातील नेप्ती गावात अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्ताने गावातील श्रीराम श्रीराम मंदिरात आनंद सोहळा साजरा केला
गावातील सामजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी गाव जेवणासह दिवाळी साजरी केली
संपूर्ण गावात राम पालखीची प्रदक्षिणा घालण्यात आली. मिरवणुकीच्या स्वागतासाठी महिलांनी घरा समोर सडा, रांगोळी टाकल्या होत्या. जय श्रीरामच्या घोषणेने गावाचा परिसर दणाणून निघाला.
नेप्ती ग्रामस्थांच्या वतीने गावातून राम पालखी मिरवणूक काढण्यात आली गावात पालखीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. ह.भ.प.डॉ.गंधे यांचे प्रवचन झाले . डॉ .गंधे आणि ग्रामस्थांच्या वतीने कार सेवक कै. दिलीप मुरलीधर चौगुले यांचे पुतणे समाजसेवक अमोल चौगुले आणि कारसेवक विष्णू गुंजाळ यांचा सन्मान करण्यात आला.

६ डिसेंबरला १९९२ रोजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व लालकृष्ण अडवाणी यांच्या विचाराने प्रेरित होऊन मी व कै .दिलीप चौगुले यांनी कार सेवा केली. पुण्याला कामानिमित्त जात असल्याचे सांगून घर सोडले. आयोध्येतून घुमटाची ,पायाची ,भिंतीची, कळसाची अश्या चार विटा आणून शहराचे तत्कालीन आमदार स्व. अनिल राठोड यांच्या सहकार्याने ग्रामस्थांनी त्याच विटाचा वापर करून महाराष्ट्रातील पाहिले राम मंदिर नेप्ती गावात बांधले. ऊन, वारा व थंडीची परवा न करता १२ दिवस घर सोडून जीवावर उदार होऊन आम्ही कार सेवा केली पण आमचे सहकारी कै.दिलीप मुरलीधर चौगुले हे आज हा क्षण पाहण्यासाठी नाहीत याची खंत मनामधे आहे तर गावातील सर्व महिला , ग्रामस्थांनी ,युवा मंडळानी , गावात एकत्र येऊन दिवाळी साजरी केल्याचे. कार सेवक विष्णू गुंजाळ पोपट मोरे अमोल चौगुले यांनी सांगितले
