अवैध दारूविरुद्ध च्या उपोषणात सामील व्हा

अकोले प्रतिनिधी
अकोल्यात शाहूनगर मध्ये अवैध दारूने २३ मृत्यू झाले तरी हप्ते देऊन तिथली दारूविक्री सुरूच आहे.तालुक्यातील अवैध दारू विक्री विरुद्ध 15 ऑगस्टला अकोले पोलीस स्टेशन समोर उपोषण करण्यात येणार आहे या आंदोलनात नागरिकांनी सहभागी वहावे असे आवाहन दारूबंदी लढ्यातील सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी केले आहे
तालुक्यात देशी दारूची फक्त ६ अधिकृत दुकाने आहेत तरी देशी दारू सर्व प्रमुख गावात मिळतेआहे अवैध दारू विक्री तालुक्यात सुरू असल्याने अनेकांचे प्रपंच उध्वस्त होत आहे यासाठी या दारू विक्री विरुद्ध उपोषण करण्यात येत आहे
१) अवैध दारू विकणारे तडीपार करा,अवैध दारू विक्रेते यांना जी दुकाने दारू पुरवतात त्यांचे परवाने रद्द करा
२)हप्ते घेणारे अधिकारी निलंबित करा
या मागणीसाठी आपण १५ऑगस्ट रोजी अकोले पोलीस स्टेशनसमोर उपोषण करत आहोत.
अकोल्यातील शाहूनगर अकोले(७ ठिकाणी विक्री)
इंदोरी फाटा, विरगाव फाटा ,देवठाण
समशेरपूर,धामणगाव पाट,लिंगदेव
कोतुळ,राजूर (दारुबंदी असून ७ ठिकाणी विक्री) ब्राह्मणवाडा अवैध दारू विक्री होत असल्याची माहिती आहे या
वरील गावाव्यतिरिक्त आपल्या गावातील अवैध दारू सुरू असल्याची माहिती हेरंब कुलकर्णी 8208589195 या फोनवर कळवावी व
१५ऑगस्ट ला या विषयावर होणाऱ्या उपोषनात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे करत आहोत
या उपोषणात वरील गावातील व तालुक्यातील सर्वांनी सामील व्हावेअसे आवाहन अकोले तालुका दारुबंदी आंदोलनना चे वतीने करण्यात आले आहे