टाहाकारी च्या जगदंबा देवीचा यात्रा उत्सव संपन्न

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील टाहाकारी गावच्या आई जगदंबा देवीचा तीन दिवसाचा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला , जागतिक महामारी करोना च्या दोन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर प्रथमच भरलेल्या यात्रेला महाराष्ट्रातील हजारो भाविकांनी गर्दी केली होती. याप्रसंगी सूर्योदयाबरोबर सुरू झालेल्या आई जगदंबेच्या अभिषेक आणि मिरवणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या हजारो भाविकांनी सहभाग घेतला होता. यावेळी आई जगदंबेच्या रथाच्या मिरवणुकीचे सारथ्य अकोले तालुक्याच्या आमदार डॉ किरण लहामटे यांनी केले, त्याच बरोबर ह्या मिरवणुकीमध्ये हजारोंच्या संख्येने ढोल ताशा आणि टाळमृदुंगाच्या नादावर नाचणाऱ्या जनतेबरोबर आमदार किरण लहामटे व त्यांच्या पत्नी सौ शोभा लहामटे यांनी फुगडी नाद आणि पारंपारिक नृत्य ही केले, या मिरवणुकीच्या वेळी संपूर्ण गाव भर मोठ्या उत्साहाने आईची पूजा केली गेली व नैवद्याचा मान दिला गेला,

यावेळी अनेक भाविकांनी आई जगदंबेचे दर्शन घेऊन दोन वर्ष अपूर्ण राहिलेले नवसही फेडले, देवीच्या मंदिरात मुख्य अभिषेकाचा मान जिल्हा परिषदेच्या सदस्य सौ सुषमाताई दराडे व त्यांचे पती श्री बाजीराव दराडे, उद्योजक श्री अविनाश एखंडे व मुंबई मंडळाचे संचालक श्री कैलास केदार यांना देण्यात आला, आई जगदंबेच्या यात्रेच्या निमित्ताने मातृभूमी प्रतिष्ठान च्या वतीने रक्तदान शिबिर, जलतरण स्पर्धा भरवण्यात आली व वेगवेगळ्या क्षेत्रात नाव मिळवलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला,

या वर्षी यात्रेचे मुख्य आकर्षण होते ते महिला व पुरुष यांच्या दुहेरी कुस्त्यांचे ,कुस्तीच्या आखाड्या मध्ये महिला पैलवान कुमारी आदिती एखंडे हिने प्रथम पारितोषिक पटकावले,
