पिंपळगाव नाकविंदा ग्रामपंचायत उपसरपंचपदी मारूती काळे यांची निवड.

अकोले/प्रतिनिधी–
अकोले तालुक्यातील पिंपळगाव नाकविंदा येथील ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया संपन्न झाल्यानंतर नवनिर्वाचीत सदस्यांमधुन उपसरपंचांची निवडणूक प्रक्रिया नायब तहसिलदार गणेश भानावसे यांच्या उपस्थितीत येथील ग्रामपंचायत कार्यालयात नुकतीच पार पडली.
या उपसरपंच निवडणूकीत मारूती रामभाऊ काळे यांची एकमताने निवड झाली. ग्रामपंचायत निवडणूकीत लक्ष्मण सोंगाळ हे सरपंचपदी निवडून आले होते. तर मारूती काळे,नवनाथ जाधव,शिवराम मेंगाळ, चिमन मेंगाळ, सुमन आढळ,रखमाबाई मेंगाळ, अलका आभाळे,सुरेखा लगड,कमल सोंगाळ यांची सदस्य पदी निवड झाली होती.सरपंच पदासह दहा उमेदवार निवडून आले होते.यापैकी उपसरपंच पदाची निवड बाकी होती.या निवडणूकीत सर्व सदस्यांमधुन उपसरपंचपदी जुन्या पिढीतील कर्तबगार व्यक्तीमत्व म्हणून मारूती काळे यांची एकमताने निवड करण्यात आली.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
यावेळी नवनिर्वाचित सरपंच, सदस्य तसेच नायब तहसिलदार गणेश भानावसे,कामगार तलाठी सचिन मांढरे,ग्रामसेविका अर्चना शिंदे,कोतवाल सुनिल गायकवाड, कर्मचारी देवराम बगनर यांसह गोरक्ष आभाळे,सुभाष आभाळे,रविंद्र लगड,सुभाष बोऱ्हाडे,संतोष लगड,शिवराम सदगिर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
