इतर
पुणे येथे कविसंमेलन व काव्योतसव पुस्तकाचा प्रकाशन सोहळा

पुणे प्रतिनिधी
काव्यानंद प्रतिष्ठान, पुणे ७ वा वर्धापन दिवस समारंभ निमित्ताने कविसंमेलन व प्रकाशन समारंभ काव्यानंद परिवारातील कवींच्या भारतीय सणांवरील कवितांचा प्रातिनिधिक काव्यसंग्रह ‘काव्योत्सव’ या पुस्तकाचे प्रकाशन व साईश इन्फोटेक अँड पब्लिकेशन्स तर्फे प्रकाशित ‘काव्यगीता’ लेखिका सौ. वंदना ताम्हाणे या ग्रंथांचे प्रकाशन तसेच ‘प्रेमांकुर बहरतांना’ लेखिका सौ. संगीता काळभोर लिखित या लघु कादंबरीचे प्रकाशन कार्यक्रम शनिवार दिनांक २५ नोव्हेंबर २०२३ सकाळी १०.३० ते ३.३० आयोजित केला आहे
स्वातंत्र्यवीर सावरकर सदन, पेठ क्र. २५ सिंधुनगर, प्राधिकरण, निगडी, पुणे –४४ येथे
- होणाऱ्या कार्यक्रमाचे उदघाटन
पदमश्री श्री. गिरीश प्रभुणे
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व प्रमुख पुनरुत्थान समरसता गुरुकुलम,पुणे यांचे हस्ते व ज्येष्ठ साहित्यिक व संत चित्रकार श्री वि ग सातपुते यांचे अध्यक्षतेखाली खाली होत आहे
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून
श्री. अरविंद दौडेज्येष्ठ साहित्यिक व उपाध्यक्ष समरसता साहित्य परिषद
श्री. तुकाराम पाटील ज्येष्ठ साहित्यिक व कवी, गझलकार उपस्थित राहणार आहेत
याप्रसंगी अनेक कवी कवीयत्री उपस्थित राहणार असून याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन निमंत्रक
वंदना ताम्हाणे, मुंबई
संगीता काळभोर, मुंबई ,सीमा गांधी
समस्त विश्वस्थ मंडळ, काव्यानंद प्रतिष्ठान, पुणे
साईश इन्फोटेक अँड पब्लिकेशन्स, पुणे यांनी केले आहे