मुळा परिसरात दुध उत्पादकांनी केली शासन आदेशाची होळी

कोतुळ प्रतिनिधी
दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य या वतीने अकोले तालुक्यात मुळा खोरे परिसरातील कोतुळ ,धामणगावपाट , बोरी , पिंपळगाव खांड येथे आज शुक्रवारी आंदोलन करत शासन निर्णयाची होळी केली
धामाणगाव पाट येथे कॉ सदाशिव साबळे,कॉ ज्ञानेश्वर शिंगवाण ,कॉ दिलिप राउत , गोरख चौधरी ,मारुती वंडेकर ,बबन भोर ,भास्कर वाघ, सचिन भोर,कॉ बाळु शेळके, ज्ञानदेव भोर , दिनेश शेळके,लक्ष्मण , हुसेन जगताप,किरण घुले यांचे नेतृत्वाखाली दुधभाव वाढीसाठी राज्यशासनाचे आदेशाची होळी करुन आंदोलन करण्यात आले.
पिंपळगावखांड या ठिकाणी कॉ सदाशिव साबळे ,सागर शेटे ,दत्तु वाल्हेकर,लक्ष्मण शेटे , रंगनाथ सोनवणे यांनी शासन आदेशाची होळी करून दुध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरले

कोतुळ येथील खटपट नाका चौकात दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने कॉ सदाशिव साबळे ,बाळु देशमुख , गणेश जाधव ,आनिल भाऊसाहेब देशमुख , भाऊसाहेब हनुमंत देशमुख , सतिश देशमुख , बाळासाहेब भाऊसाहेब देशमुख , प्रकाश देशमुख , अमोल रंगनाथ देशमुख ,भाऊसाहेब देशमुख , बाळासाहेब देशमुख , अभिजित देशमुख , गणेश देशमुख , रमेश देशमुख , रेवणनाथ देशमुख ,यांच्या नेतृत्वाखाली शासन आदेशाची होळी करून दुध भाववाढीसाठी दुध अभिषेक करण्यात आला
रस्त्यावर दुध ओतुन शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला.

—/////—–