राशिभविष्य

आजचे पंचांग व राशिभविष्य दि.०५/०४/२०२४

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- चैत्र १६ शके १९४५
दिनांक :- ०५/०४/२०२४,
वार :- भृगवासरे(शुक्रवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:२१,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:४३,
शक :- १९४५
संवत्सर :- शोभन
अयन :- उत्तरायण
ऋतु :- शिशिरऋतु
मास :- फाल्गुन
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- एकदशी समाप्ति १३:२९,
नक्षत्र :- धनिष्ठा समाप्ति १८:१७,
योग :- साध्य समाप्ति ०९:५५, शुभ ३०:१४,
करण :- कौलव समाप्ति २३:५७,
चंद्र राशि :- मकर,(०७:१३नं. कुंभ),
रविराशि – नक्षत्र :- मीन – रेवती,
गुरुराशि :- मेष,
शुक्रराशि :- मीन,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- उत्तम दिवस,

✿राहूकाळ:- सकाळी १०:५९ ते १२:३२ पर्यंत,

लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०७:५४ ते ०९:२६ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०९:२६ ते १०:५९ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी १२:३२ ते ०२:०५ पर्यंत,

❀ दिन विशेष:
पापमोचनी एकादशी, व्दादशी श्राद्ध,
————–

🌏 दैनिक राशीभविष्य 🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- चैत्र १६ शके १९४५
दिनांक = ०५/०४/२०२४
वार = भृगवासरे(शुक्रवार)

मेष
कामातील बदल समजून घ्या. कामाचा व्याप वाढता राहील. मनावर फार ताण घेऊ नका. मानपमानाचे प्रसंग फार मनावर घेऊ नका. आवडीच्या पदार्थांसाठी आग्रही राहाल.

वृषभ
घराची दुरूस्ती काढाल. कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण राहील. काही नवीन संधी चालून येतील. तरुण वर्गाशी मैत्री कराल. प्रापंचिक सौख्य उत्तम राहील.

मिथुन
मित्रा मंडळींचा गोतावळा जमवाल. विश्वासू लोकांकडेच मन मोकळे करावे. व्यावसायिक अडचणी दूर कराव्यात. सामाजिक कामाकडे ओढ वाढेल. मुलांच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे.

कर्क
घरात धार्मिक कार्यक्रम निघतील. चैनीच्या वस्तु खरेदी कराल. कामाच्या ठिकाणी आपली आब राखून राहाल. पथ्य पाण्याकडे लक्ष द्यावे. मानसिक सौख्य जपावे.

सिंह
कामाच्या ठिकाणी व्याप वाढता राहील. योग्य वेळी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. व्यसनांपासून लांब राहावे. मित्रांची मदत वेळेवर मिळेल. जोडीदाराकडून अपेक्षा वाढेल.

कन्या
कोर्टाची कामे लांबणीवर पडतील. घरच्या मंडळींचे सौख्य वाढेल. वादाचे प्रसंग टाळण्याचा प्रयत्न करा. जोडीदाराच्या सुशिक्षितपणाचे कौतुक कराल. मनातील गैरसमज काढून टाकावेत.

तूळ
एकमेकांच्या बाजू विचारात घ्याव्यात. आर्थिक व्यवहार तज्ञांच्या सल्ल्याने करावा. राहत्या घराचे प्रश्न उभे राहतील. मुलांच्या अडचणी समजून घ्याव्यात . घाई घाईने कोणतेही काम करू नका.

वृश्चिक
तब्येतीत सुधारणा दिसून येईल. दगदग वाढली तरी फळ चांगले मिळेल. मैत्रीत गैरसमज संभवतात. चांगल्या संगतीत राहावे. जवळचा प्रवास काळजीपूर्वक करा.

धनू
कामात इतरांची मदत घ्यावी लागेल. इतरांच्या सल्ल्याने नवीन योजना आखाल. घरच्या दुरूस्तीचे काम निघू शकते. मनावर काहीसे दडपण राहील. कामातून समाधान शोधावे.

मकर
जोखमीचे व्यवहार सावधतेने करा. प्रेम प्रकरणात जवळीक वाढेल. मुलांच्या समस्या सोडवाव्या लागतील. . सहकार्‍यांकडून कौतुक केले जाईल. नवीन आर्थिक योजना आखाल.

कुंभ
उष्णतेचे विकार संभवतात. कामाचा आलेख वाढता राहील. क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल. आपल्या बुद्धीचा कस लागू शकतो. वरिष्ठांकडून प्रशंसा केली जाईल.

मीन
सामाजिक कामातून ओळखी वाढतील. स्थावरचे व्यवहार जमून येतील. मित्राची वेळेवर मदत मिळेल. मनावरील ताण कमी करण्याचं प्रयत्न करा. जवळच्या व्यक्तीशी मनमोकळ्या गप्पा होतील.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button