अकोल्यातील अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. आदिवासी भागात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गारा पडून मोठी नुकसान झाली आहे. सरकारी पातळीवर तातडीने नुकसान ग्रस्त भागांची पाहणी करून पंचनामे करावेत अशी मागणी अकोले तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुशांत आरोटे आणि शेतकऱ्यांनी केली आहे.
काल अकोले तालुक्यातील काही भागात दुपार पासूनच तर काही भागात सायंकाळ पासून जोरदार पावसाने हजेरी लावली आणि शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही नागरिकांच्या घरांचेही नुकसान झाले आहे.काहींची गुरांच्या गोठ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आढळा विभागात सध्या दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केली आहे परंतु काही शेतकऱ्यांनी कसे तरी कांद्याची रोपे जगवली होती तीही पावसाने खराब झाली आहे.काहींच्या कांदा लागवडीचे नुकसान झाली आहे. तालुक्यातील काही भागात द्राक्ष,कांदा रोपे,नुकतीच लागवड केलेले कांदे यांचे मोठे नुकसान झाले आहे.
तरी महसून आणि कृषी विभागाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी अशी आग्रही मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुशांत आरोटे,उपाध्यक्ष सुनील पुंडे,सुरेश नवले,सोमनाथ आहेर,अशोक दतीर,संजय उगले (टेलर),शुभम आंबरे, प्रवीण आहेर, ग्रामपंचायत सदस्य पोपट आहेर, विवेक आंबरे आदी शेतकऱ्यांनी केली आहे.
अकोले तालुक्यात जोरदार पाऊस तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गारा पडून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. महसूल व कृषी विभागाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी अशी मागणी केली आहे.
श्री.सुशांत आरोटे
तालुकाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना अकोले