नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आर. पी. आय. चे आमरण उपोषण सुरू

नाशिक प्रतिनिधी
राज्यातील महार वतनाच्या जमिनी वतनदारांना’ वतनदारांच्या वारसांना परत (रिस्टोर) करा या मागणींसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( आंबेडकर गटाच्या) वतीने आज दि २९ /११/२०२३ पासून नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले
आर.पी.आय.चे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे , यांचे मार्गदर्शनाखाली
रिपब्लिकन पाटी ऑफ इंडिया (ए)चे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दारोळे, नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख अशोक गायकवाड यांनी दिला आहे नाशिक जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष विनोद भोसले ,निलेश उनवणे आदि या उपोषणात सहभागी झाले
आमच्या पूर्वजांच्या कष्टाचा मोबदला म्हणून मिळालेल्या हककांच्या वतनाच्या जमिनी आम्हाला मिळाल्याचं पाहिजे
गावातील धनधांडग्या लोकांनी प्रतिष्ठित समाजाने, राजकारणी, सावकारांनी महार वतनाच्या जमिनी कवडीमोल भावात धाक धपटशा दाखवुन अन्यायाने विकत घेतल्या त्या सर्व जमिनी वतनदारांना परत करुन द्या त्या रिस्टोर करा.
धनधांडग्या लोकांनी बळजबरीने कवडीमोल भावात विकत घेतल्या आहेत किंवा कुळकायद्याने जमिनीवर ताबा मिळविला आहे. बऱ्याच महार वतनी जमिनी बेकायदा किंवा कायद्याने रद्द होऊ शकणारे हस्तांतरण मागासवर्गीय समाजा व्यतिरिक्त (नॉनबेकवर्ड) जमातीच्या कब्जात गेल्या असुन ते नविन शर्ती विरोधी कृत्य आहे.

तसेच अनधिकृत ताबा असलेल्या जमिनी त्या सर्व जमिनी बेकायदेशीर हस्तांतरण केवळ १०० रु. च्या स्टॅम्पवर कोणतेही खरेदीखत न करता मागासवर्गीय समाजातील अशिक्षीतपणाचा गैरफायदा घेवुन परस्पर पैशाचा वापर करुन तलाठ्याद्वारे नोंदी करुन घेतलेल्या असुन सदरच्या नोंदी ह्या बेकायदेशीर व कायद्याला अनुसरुन अशा नाहीत. अशा बेकायदेशीर नोंदीमुळे शासनाचा कर बुडवून खरेदी झालेल्या असुन सदरच्या सर्व जमिनी महार समाजाला परत रिस्टोर करण्यात याव्या अशी मागणी केली आहे
‘