पैठण तालुक्यात 1 जानेवारीच्या फुले दांपत्य सन्मान रॅलीची जैयत तयारी

पैठण: – माळी महासंघ, तालुका पैठण यांच्या वतीने 1 जानेवारी रोजी होणाऱ्या फुले दांपत्य सन्मान रॅली आणि माळी एकता विजय दिवस साजरा करण्याच्या अनुषंगाने बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश संघटन सचिव श्री. आसाराम विरकर, मराठवाडा विभाग अध्यक्ष श्री. देवनाथ मामा जाधव, जालना जिल्हा अध्यक्ष श्री. संतोष रासवे, आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष श्री. कल्याण रंधे यांच्या प्रमुख उपस्थितीत चर्चा सत्र पार पडले.
बैठकीत रॅलीच्या आयोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. समाजाच्या एकात्मतेला बळकटी देण्यासाठी आणि फुले दांपत्याच्या विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी ही रॅली महत्त्वाची असल्याचे मान्यवरांनी सांगितले.
या प्रसंगी पैठण तालुक्यातील अनेक समाजबांधव उपस्थित होते, ज्यामध्ये सोपानराव शिंदे, डॉ. विठ्ठल पाबळे, सागर तुपे, शिवाजी बोराडे, सुनील खादबने, संतोष दहीहंडी, शिवाजी जाधव, अनिल जाधव आदींचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वांनी एकजूट होऊन काम करण्याचे ठरवले. समाजाच्या प्रगतीसाठी अशा उपक्रमांना पाठबळ देण्याचे आवाहन करण्यात आले