गॅस सिलेंडर च्या दरात झाली वाढ !

मुंबई-डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात आज वाढ करण्यात आली असून, याचा सर्वसाधारण व्यावसायिकांना झटका बसणार आहे.
भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर २१ रुपयांनी वाढवले आहेत. .
यापूर्वी १ नोव्हेंबर रोजी तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल १०१.५० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. सलग दुसऱ्या महिन्यात व्यावसायिक गॅसच्या दरात वाढ करण्यात आल्याने मुंबईत व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर १७४९ रुपये इतके झाले आहेत.
घरगुती वापरासाठी वापरल्या जाणाऱ्या १४.२ किलोच्या सिलिंडरच्या दरात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. दोन महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल २०० रुपयांची कपात केली होती. यानंतर नोव्हेंबरमध्ये त्यात कुठलाही बदल करण्यात आला नाही आणि आजही त्यांचे दर पूर्वीप्रमाणेच आहेत. यामुळे घरगुती ग्राहकांना दिलासा मिळाला आहे
. दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत १७७५.५० रुपयांवरून १७९६.५० रुपयांवर आली आहे. तर मुंबईत व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत १७२८ रुपयांवरून १७४९ रुपयांवर पोहोचली आहे. तर कोलकाता येथे व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत २२.५ रुपयांची वाढ झाली असून किंमत १८८५.५० रुपयांवरून १९०८ रुपयांपर्यंत वाढली आहे. चेन्नईमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत सर्वाधिक २६.५ रुपयांनी वाढ झाली आहे.