अगस्ति ’च्या गाळपाची गुरुवारी सांगता!

‘
अकोले प्रतिनिधी
– अकोले तालुक्याची कामधेनू असलेल्या अगस्ति सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२१-२२ च्या २८ व्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ गुरुवारी २६ मे २०२२ रोजी दुपारी ४.००वा होत आहे
कारखान्याचे संस्थापक चेअरमन, माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे शुभहस्ते व कारखान्याचे उपाध्यक्ष आणि अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे माजी चेअरमन.सिताराम पाटील गायकर ,संचालक व सभासदांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे
अगस्ती ने यावर्षी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, उच्चांकी गाळप पुर्ण केले असुन नैसर्गिक अडचणी,
आव्हानात्मक परिस्थितही सभासद शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करीत कारखान्याने यशस्वी गाळप पुर्ण केले आहे. अडचणी असल्या तरी त्यावर मात करीत, इतर कारखान्याचे तुलनेत वेळेत गाळप पुर्ण केले असल्याचे कार्यकारी संचालक अजितराव देशमुख यांनी सांगितले