आजचे पंचांग व राशीभविष्य दि .०७/१२/२०२३

:
🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- अग्रहायण १६ शके १९४५
दिनांक :- ०७/१२/२०२३,
वार :- बृहस्पतीवासरे(गुरुवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:५०,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०५:५१,
शक :- १९४५
संवत्सर :- शोभन
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- शरदऋतु
मास :- कार्तिक
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- दशमी समाप्ति २९:०७,
नक्षत्र :- हस्त अहोरात्र,
योग :- आयुष्मान समाप्ति २४:००,
करण :- वणिज समाप्ति १६:१०,
चंद्र राशि :- कन्या,
रविराशि – नक्षत्र :- वृश्चिक – ज्येष्ठा,
गुरुराशि :- मेष,
शुक्रराशि :- तुला,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- दु. ०४प. चांगला दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी ०१:५३ ते ०३:०६ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
शुभ मुहूर्त — सकाळी ०६:५० ते ०८:१२ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी १२:२१ ते ०१:४३ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०१:४३ ते ०३:०६ पर्यंत,
शुभ मुहूर्त — संध्या. ०४:२९ ते ०५:५१ पर्यंत,
❀ दिन विशेष:
घबाड २९:०७ प., भद्रा १६:१० नं. २९:०७ प.,
————–
: 🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- अग्रहायण १६ शके १९४५
दिनांक = ०७/१२/२०२३
वार = बृहस्पतीवासरे(गुरुवार)
मेष
धीराने व शांततेने सर्व गोष्टी घ्याव्यात. आंधळा विश्वास ठेऊ नका. कुटुंबासाठी काही विशेष गोष्टी कराल. आवडीच्या पदार्थांवर ताव माराल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील.
वृषभ
दिवस आपल्या मनाप्रमाणे व्यतीत कराल. आवडत्या गोष्टी करायला मिळाल्याने आपण खुश असाल. सर्वांना प्रेमाने जिंकून घ्याल. प्रेमातील लोकांनी सबुरीने घ्यावे. मैत्रित मतभेद आड आणू नका.
मिथुन
वैचारिक स्थैर्य बाळगा. काही गोष्टी कृतीतून दाखवून द्या. कलात्मक गोष्टीत आनंद वाटेल. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. बदल समजून घेऊन कामात हात घाला.
कर्क
भावंडांना मदत कराल. मनातील इच्छा पूर्ण करून घ्याल. वरिष्ठांना नाराज करू नका. घरातील ज्येष्ठ मंडळींचे विचार विरोधी वाटू शकतात. व्यापारी वर्गाला लाभदायक दिवस.
सिंह
कामानिमित्त प्रवास घडेल. हातातील अधिकाराचे बळ दाखवा. हातापायला किरकोळ इजा संभवते. लहान दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका. विरोधक माघार घेतील.
कन्या
आहाराची पथ्ये पाळावीत. चटकन प्रतिक्रिया दर्शवू नका. वादाचे प्रसंग टाळावेत. आत्मविश्वास कमी पडू देऊ नये. आवडी-निवडीकडे अधिक लक्ष द्याल.
तूळ
अचानक धनलाभ संभवतो. कामाच्या ठिकाणी तणाव जाणवू शकतो. संयमाने कामे करावी लागतील. कौटुंबिक स्थिती सलोख्याने हाताळावी. व्यावसायिक योजनावर विचार कराल.
वृश्चिक
काही गोष्टी मनाविरुद्ध वाटू शकतात. वरिष्ठांच्या मतानेच चालावे. झोपेची तक्रार जाणवेल. काही कामे बौद्धिक कस पाहू शकतात. मैत्रीच्या बाबतीत साशंकता जाणवेल.
धनू
हातातील संधी सोडू नका. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. नातेवाईकांना मदत कराल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कामाच्या स्वरूपाचा नीट अंदाज घ्यावा.
मकर
मनातील साशंकता दूर करावी. धार्मिक गोष्टीत मन रमेल. प्रामाणिकपणे कार्यरत राहाल. प्रवास करताना सावधगिरी बाळगावी. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे.
कुंभ
घरगुती वातावरण उत्तम राहील. कौटुंबिक कामात आनंद मानाल. गुंतवणूक करताना सावधानता बाळगावी. घाईने निर्णय घेऊ नयेत. तिखट शब्दांचा वापर टाळावा.
मीन
सर्व बाजूंचा नीट विचार करून वागावे. आततायीपणा करू नका. चटकन कोणत्याही निर्णयावर येऊ नका. अडचणीतील लोकांना मदत कराल. धैर्य व संयम आवश्यक.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर