
.
औरंगाबाद प्रतिनिधी
महात्मा बसवेश्वर यांची जयंती येथील महालक्ष्मी चौकात रिक्षा स्टँडवर साजरी केली .राजर्षी शाहू सार्वजनिक वाचनालय सिनगाव जहागीरच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
कार्यक्रमाचे अध्यक्ष महादेव नन्नवरे यांनी प्रतिमेला
पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी प्रमुख पाहुणे महादेव शिंदे, दीपक जोगदंड, राजेंद्र सूर्यवंशी, डॉ. किशन शिंदे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महादेव नन्नावरे म्हणाले की, महात्मा बसवेश्वरांनी समाजातील अनिष्ट प्रथा, परंपरा, चालीरिती विरोधात जनजागृती केली. समाजाला हितकारक, दिशा देण्याचे काम त्यांनी केले. ते फार मोठे संत होते. अक्षय तृतीयतेच्या दिवशी कर्नाटकात संत बसवेश्वरांचा जन्म वीरशैव लिंगायत संप्रदायात झाला. आज योगायोग म्हणायला हरकत नाही. महाराजांची जयंती, अक्षय तृतीया आणि ईद हा तिहेरी संगम जुळवून आला. यावेळी दुर्गामाता रिक्षा स्टँडचे सर्व रिक्षाचालक हजर होते.
यावेळी दगडूबा मुंढे, विलास देवरे, जय शिरोळे, संतोष पदमे, संजय सुरशे, संतोष खोकले, योगेश इप्पर,दिवाकर वैद्य, सदाशिव जोशी, दामोदर नागवे यांची उपस्थिती होती वाचनालयाचे अध्यक्ष भगवान मुंढे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले
.——