कळसुबाईच्या शिखरावर नववर्षाचे जल्लोषात स्वागत!

संजय महानोर
भंडारदरा प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यातील घोटी येथील कळसुबाई मित्र मंडळाच्या गिर्यारोहकांनी सालाबादप्रमाणे ( वर्ष २५ वे) पहाटेच महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखराची चढाई करून सूर्योदयाचे पहिले किरण पडताच कळसुबाई मातेचा अभिषेक करून महाआरती करत नववर्षाचे स्वागत केले
.कोरोना नावाच्या राक्षसाच्या तिसऱ्या लाटे पासून जनतेला वाचव असे साकडे कळसुबाई मातेचरणी गिर्यारोहकांकडून करण्यात आले. यावेळी मातेचा जयघोष करीत छत्रपती शिवाजी महाराज की जय ,भारत माते की जय या घोषणा देऊन इंग्रजी नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आले.या उपक्रमात औरंगाबाद जिल्ह्यातील दिव्यांग बांधव सहभागी झाले होते.

कोरोना नावाच्या राक्षसाच्या तिसऱ्या लाटे पासून जनतेला वाचव असे साकडे कळसुबाई मातेचरणी गिर्यारोहकांकडून करण्यात आले. यावेळी मातेचा जयघोष करीत छत्रपती शिवाजी महाराज की जय ,भारत माते की जय या घोषणा देऊन इंग्रजी नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आले.या उपक्रमात औरंगाबाद जिल्ह्यातील दिव्यांग बांधव सहभागी झाले होते.

कळसुबाई मित्र मंडळाचे अध्यक्ष भगीरथ मराडे,निलेश पवार,बाळासाहेब आरोटे,सुरेश चव्हाण,गजानन चव्हाण, प्रविण भटाटे,अशोक हेमके,आदेश भगत,ज्ञानेश्वर मांडे,सोमनाथ भगत,नितीन भागवत,शुभम जाधव, उमेश दिवाकर,पुरुषोत्तम बोऱ्हाडे,रमेश हेमके,रुदरेश हेमके,भगवान तोकडे, देविदास पाखरे,कृष्णा बोऱ्हाडे,नगमा खलिफा,चतुर्थी तोकडे इत्यादी गिर्यारोहक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
५५ दिव्यांगांनी कळसूबाई सर केले
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणुन प्रसिद्ध असणा-या कळसुबाई शिखराची नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रातील ५५ दिव्यांग तरुणांनी सर केले असुन त्यांच्या जिद्दीचे व चिकाटीचे परीसरातुन कौतुक केले जात आहे .
दिव्यांगात ऊर्जा पेरण्यासाठी शिवुर्जा प्रतिष्ठानकडून दरवर्षी नव वर्ष दिनी राज्यातील दिव्यांगाना घेऊन कळसुबाई शिखर सर केले जाते.या वर्षी मोहिमेचे दहावे वर्ष होते .राज्यातून बीड,पुणे ,अकोला,औरंगाबाद,सोलापूर,सांगली,नाशिक,मुंबई,ठाणे,जालना इत्यादी जिल्ह्यातून ५५,दिव्यांग सहभागी झाले होते.यामध्ये सात महिला सहभागी होत्या.
३१ डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता चढाईला सुरूवात केली.शेतातील पायवाट,काही ठिकाणी बांधलेल्या पाय-या व काही ठिकाणी कोरलेल्या पाय-या ,अवघड लोखंडी शिड्या सर करत काठी कुबड्यांचा आधार घेत सारे दिव्यांग रात्री सात वाजता कळसुबाईच्या शिखराजवळील विहीरीपाशी कापडी तंबुत मुक्कामी थांबले.एक जानेवारीचा सूर्योदय होण्यापूर्वीच पहाटे लवकर उठून कळसुबाई शिखरावर जाऊन बसले.सर्वोच्च शिखरावरून नव्या वर्षाच्या सूर्याचे दर्शन सकाळी सव्वासातला झाले.एकमेकांचे अभिनंदन करून सकाळी नऊ वाजता शिखर उतरणीस प्रारंभ झाला.

दुपारी एक वाजता कळसुबाई माची मंदिराजवळ कळसुबाई शिखराची माहिती देणारा फलक लावून त्याचे अनावरण करण्यात आले.शिवुर्जा प्रतिष्ठानकडून लावण्यात आलेल्या माहिती फलकाचे प्रायोजकत्व डॉ.अनिल बारकुल यांचे आहे. सर्व दिव्यांगाना प्रमाणपत्र वाटप करून पुरणपोळीच्या जेवणाने कार्यक्रमाची सांगता झाली.
यावर्षी या मोहीमेत बीड येथून प्रसिद्ध डॉक्टर अनिल बारकुल ,सौ.डॉ.सुनिता बारकुल व दुर्ग अभ्यासक कचरू चांभारे सहभागी झाले होते. दिव्यांगाची दहावी कळसुबाई मोहीम शिवुर्जा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी गाडे यांच्या नेतृत्वात यशस्वी व सुरक्षितपणे पार पडली.

मोहीम यशस्वी करण्यासाठी सचिव कचरू चांभारे,जगन्नाथ चौरे ठाणे,डॉ.अनिल बारकुल,धर्मेंद्र सातव पुणे,अंजली प्रधान नाशिक,सुरेखा ढवळे पुणे,जनार्दन पानमंद रायगड ,केशव भांगरे अकोले,मच्छिंद्र थोरात शिरूर,लक्ष्मण वाघे सोलापूर,सागर बोडखे नाशिक,जीवन टोपे राजगुरूनगर ,सतिश आळकुटे यांनी विशेष सहकार्य केले. या मोहीमेत डॉ.सुरज बटुले पैठण,अमोल शिंदे परतूर,शबाना पखालीआजाद,काजल कांबळे सांगली,तुकाराम कदम उस्मानाबाद,हर्ष बाबर पुणे,ओम तारू,पार्थ चौधरी कल्याण,सचिन मानकर ,सुनील वानखेडे हे सामिल झाले होते .