दहिगाव ने येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भरला बालआनंदी बाजार

शेवगाव– आज बाल आनंदी बाजारात दहिगाव ने येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतला खरेदी विक्री व्यवहाराचा अनुभव.
दहिगाव ने केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. ज्ञानेश्वर जाधव तसेच मुख्याध्यापक श्री. राजेश खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेल्या आनंदी बाजारामध्ये इयत्ता पहिली ते चौथीतील सर्व विद्यार्थ्यांनी खरेदी विक्रीतून दीड तासात 15 हजार रूपये कमाई केली.
आज सकाळी साडेआठ वाजता शाळेच्या प्रांगणात शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा श्रीम्. सुरेखाताई सच्चिदानंद कर्डिले. तसेच सरपंच प्रतिनिधी श्री. देवदान कांबळे यांच्या हस्ते फीत कापून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी गावातील मान्यवर तसेच पालक उपस्थित होते. आनंदी बाजारमध्ये सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांचा समावेश होता, सोबतच विद्यार्थ्यांनी घरून तयार करून आणलेले पदार्थ समोसे, वडापाव, ओली भेळ, सुकी भेळ , पॅटीस, साबुदाणा वडा ,पाणीपुरी , मसाला पापड, भजे पाव… या पदार्थांचा आस्वाद सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी घेतला.
शाळेमध्ये अशा प्रकारचे नवनवीन उपक्रम सुरू आहेत त्यासाठी सर्व पालकांनी शिक्षकांचे कौतुक केले.
शाळेतील शिक्षक श्रीमती राजश्री खंडागळे, श्रीमती संगीता भुसे, श्री मनोहर बैरागी, श्रीमती रत्ना वैष्णव, श्री संतोष वाघ, श्रीमती मीराबाई डमाळे, श्रीमती कविता बामदळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
