सर्वोदय विदयालयात टी.एन.कानवडे यांचा सत्कार सोहळा संपन्न.

हा पुरस्कार सत्यनिकेतन परिवाराचा आहे- टी.एन.कानवडे.
अकोले प्रतिनिधी
चांगले काम करणारा माणूस कधीच सन्मान मागत नाही.त्याचे कार्यच त्याला सन्मानास पात्र बनवते.चांगल्या कार्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र शासनाचा आदिवासी विकास विभागाचा आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त झाला.परंतु हा पुरस्कार माझा नसुन संपुर्ण सत्यनिकेतन परिवाराचा आहे.मी नाममात्र आहे.असे प्रतिपादन सत्यनिकेतन संस्थेचे सचिव टी.एन. कानवडे यांनी केले.
सत्यनिकेतन संस्थेचे सचिव तथा अॅड.मनोहरराव देशमुख महाविदयालयाचे माजी प्राचार्य टी.एन. कानवडे यांनी ग्रामीण आदिवासी विदयार्थ्यांसाठी शिक्षणाची जनजागृती केली व उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा आदिवासी विकास विभागाचा आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त झाला.

यानिमित्ताने गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय राजूर येथे त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.
यावेळी संस्थेचे जेष्ठ संचालक मिलिंदशेठ उमराणी,श्रीराम पन्हाळे,विजय पवार,विलास पाबळकर,प्राचार्य भाऊसाहेब बनकर,उपप्राचार्य अण्णासाहेब धतुरे, पर्यवेक्षक सदाशिव गिरी,ग्रंथपाल साहेबराव घुले यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,विदयार्थी उपस्थित होते.
टी.एन.कानवडे यांनी पुढे बोलताना आयुष्याच्या वाटेवरचा प्रवास कधीच ठरवून होत नसतो.जशी वळणे येतील तसे वळावच लागते.याप्रमाणे अनंत अडचणी आल्या.मात्र त्यावर मात करत जिवनात मिळालेल्या संधीचे सोने केले.अनेक स्वप्न सत्यात उतरविले.आदिवासी भागातील विदयार्थी प्रामाणिकपणे घडविले. त्यांचे कुटुंब उभे राहीले.हा जिवनातील सर्वात मोठा उच्चांक असून त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र शासनाने दखल घेतली.पुरस्कार देऊन सन्मान केला.असल्याचे विचार व्यक्त केले.
संचालक मिलिंदशेठ उमराणी यांनी आपले विचार व्यक्त करताना कानवडे सरांनी विविध क्षेत्रात कामाचा ठसा उमटवला.त्यांना प्रशासनातील उत्तम हातोटी आहे.राजूर सारख्या दुर्गम भागात प्रशासकीय सेवा केली,हे कार्य वाखन्याजोगे असून ते संस्थेला एक खंदा प्रशासक लाभला ही भाग्याची बाब असून त्यांच्या सेवेची शासनाने उचीत दखल घेतली.त्याबद्दल शासनाचे आभार व्यक्त करत कानवडे सरांचे अभिनंदन केले.
श्रीराम पन्हाळे यांनी गोरगरीबांची लेकर वसतीगृहात शिकून मोठी झाली. हे पुण्याचे कार्य कानवडे सरांच्या माध्यमातुन झाले. त्यांचा नावलौकीक अकोले, राजूरसह संपूर्ण महाराष्ट्रात झाला.या कार्याची पावती म्हणून महाराष्ट्र शासनाने दखल घेतली ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे विचार व्यक्त केले.
यावेळी संचालक श्रीराम पन्हाळे यांनी विदयालयाला क्रीडाचे ड्रेस व झांज दिल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य भाऊसाहेब बनकर यांनी केले.
सुत्रसंचलन संजय व्यावहारे यांनी केले तर पर्यवेक्षक सदाशिव गिरी यांनी उपस्थितांचे आभार मानले.