स्मशानभूमीतील लग्न सोहळा आणि २५ हजाराचा आहेर!

स्मशानभूमीतील विवाह सोहळा आणि
25 हजाराचा आहेर!
विजय खंडागळे
सोनई प्रतिनिधी
—आज कालच्या जमाण्यात घरासमोर तर नाहीच नाही एखादे गावाबाहेर मंगल कार्यालयात विवाह सोहळा संपन्न झाल्याचे पाहतो,पण सोनई ता नेवासा येथे चक्क स्मशानभूमीत झालेला विवाह सोहळा चर्चेचा विषय ठरला !
सोनई येथील आमरधाम मध्ये अंत्यविधी समयी विधी करणारे सविता व मारुती गायकवाड यांची मुलगी दुर्गा व हिंगोली येथील साहेबराव पवार यांचे पुतणे व गंगुबाई व माधव पवार यांचा मुलगा संजय या कुटुंबातील विवाह सोहळा संपन्न झाला.म्हासंणजोगी समाजाचा वधू वरचा विवाह रुढी परंपरे नुसार पार पडला.
चर्चा होती फक्त स्मशानातील विवाहाची ,परंतु दोन्ही कुटुंब हातावर पोट भरणारे व चांगला स्वभाव असल्याने सर्व जाती जमातीतील समाज यावेळी उपस्थित होता.या निमित्ताने का होईना अंत्यसंस्कार वेळी असलेली नागरिकांच्या मनातील भीती,समाज गैरसमज काहीशी प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. असा एक संदेश समाजात नक्कीच गेला,याघटनेचा सर्वत्र चर्चेचा विषय रंगला आहे.
या प्रसंगी सरपंच धनंजय वाघ, पत्रकार विजय खंडागळे, सेवानिवृत्त पी. एस.आय.शरद लिपाने,उपसरपंच प्रसाद हारकळे,सदस्य संतोष दरदले,सचिन पवार,सुनील तागड,वरिष्ठ लिपिक भास्करराव दरदले,नामदेव तोडमल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
रोख २५०००/-चा आहेर!
वधू वरच्या कुटुंबातील सदस्य यांना मंत्री शंकरराव गडाख यांच्या विचारधारेतुन जिल्हा परिषदेचे अर्थ व पशुसंवर्धन विभागाचे सभापती सुनील गडाख यांच्या हस्ते सोनई ग्रामपंचायत तर्फे रोख पंचवीस हजार रुपये मदतीचा आहेर गायकवाड व पवार कुटुंबांकडे देण्यात आला
