राजूर येथील साईबाबा मंदिर विद्युत रोषणाईने उजळले

विलास तुपे
राजूर/प्रतिनिधी
येथील राजुर पोलीस स्टेशन मध्ये असलेले साईबाबा मंदिर आज हजारोच्या पणती नी उजळून गेले
मंदिर भक्त परिवाराच्या वतीने दीपोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने हजारो दिव्यांची रोषणाई, फुलांची मनमोहक सजावट देवालयाच्या सर्व परिसरात करण्यात आली होती. हजारो भाविकांनी साईबाबा चे दर्शन घेतले
येथील राजुर पोलीस स्टेशनच्या सहकार्याने व राजूर ग्रामस्थ यांच्यावतीने हजारो दिव्यांनी संपूर्ण परिसर उजळून गेला होता. तसेच यावेळी दिव्यांनी ओम आकाराची काढलेली रांगोळी ही सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
सर्व २००० पणत्या प्रज्वलित झाल्यावर हे दृश्य
पाहण्यासाठी राजूरकर व भाविकांनी गर्दी केली होती. हे दृश्य आपल्या डोळ्यात सामावून घेत असताना मोबाईलमध्ये फोटो घेण्याची स्पर्धाच जणू येथे पाहायला मिळाली. हा मनमोहक नजारा सर्व भाविक भक्तांना खिळवून ठेवताना दिसत होता.
राजूर पोलीस स्टेशन व भाविकांनी वर्गणीतून या मंदिराचा जीणोंद्वार केला आहे. दीपोत्सव यशस्वी करण्यासाठी राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पो नि प्रवीण दातरे , लक्ष्मण जाधव, झम्पा फिटर सर्व पोलीस कर्मचारी व राजूर ग्रामस्थ यांनी केले. यावेळी राजूर सरपंच पुष्पाताई निघळे, सौ पुष्पाताई लहामटे, आदी सह राजूर ग्रामस्थ उपस्थित होते