इतर

आजचे पंचांग व राशिभविष्य दि.13/06/2024

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- ज्येष्ठ २३ शके १९४६
दिनांक :- १३/०६/२०२४,
वार :- बृहस्पतीवासरे(गुरुवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०५:५४,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०७:०५,
शक :- १९४६
संवत्सर :- क्रोधी
अयन :- उत्तरायण
ऋतु :- ग्रीष्मऋतु
मास :- ज्येष्ठ
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- सप्तमी समाप्ति २१:३४,
नक्षत्र :- पूर्वा समाप्ति २९:०९,
योग :- वज्र समाप्ति १८:०५,
करण :- गरज समाप्ति ०८:२४,
चंद्र राशि :- सिंह,
रविराशि – नक्षत्र :- वृषभ – मृग,
गुरुराशि :- वृषभ,
शुक्रराशि :- मिथुन,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- उत्तम दिवस,

✿राहूकाळ:- दुपारी ०२:०८ ते ०३:४७ पर्यंत,

लाभदायक वेळा
शुभ मुहूर्त — सकाळी ०५:५४ ते ०७:३३ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी १२:२९ ते ०२:०८ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०२:०८ ते ०३:४७ पर्यंत,
शुभ मुहूर्त — संध्या. ०५:२६ ते ०७:०५ पर्यंत,

❀ दिन विशेष:
भद्रा २१:३४ नं.,
————–


🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾
आजचा दिवस सुखाचा जावो मन प्रसन्न राहो!!!!!
💐🌺🌼🌹🌾🍀🌻🌷🌸

🌏 दैनिक राशीभविष्य 🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- ज्येष्ठ २३ शके १९४६
दिनांक = १३/०६/२०२४
वार = बृहस्पतीवासरे(गुरुवार)

मेष
मानसिक द्विधावस्था जाणवेल. अती विचारात वेळ वाया जाईल. कौटुंबिक गोष्टीला अधिक प्राधान्य द्या. सामुदायिक वादापासून दूर रहा. कामात काहीशी प्रतिकूलता जाणवेल.

वृषभ
मित्रमंडळींशी वाद संभवतात. अधिकारी वर्गाचा पगडा राहील. कष्ट अधिक व वेळ कमी अशी स्थिती राहील. मौल्यवान वस्तूंचा लाभ होईल. कौटुंबिक प्रश्नांबाबत चिंता वाटेल.

मिथुन
मानसिक स्थैर्यासाठी ध्यानधारणा करा. पैशाचा अपव्यय टाळा. मोहाला बळी पडू नका. अती अपेक्षा बाळगून चालणार नाही. कर्जाचे व्यवहार तूर्तास टाळावेत.

कर्क
भावनेच्या आहारी जाऊ नका. मनात नसत्या कल्पना रंगवत बसू नका. कौटुंबिक खर्च वाढू शकतो. हट्टीपणाने वागून चालणार नाही. मानापमानाचे प्रसंग येऊ शकतात.

सिंह
छुप्या शत्रूंचा त्रास संभवतो. हातातील लाभाबाबत गाफिल राहू नका. योग्य संधीसाठी वाट पहावी लागेल. पायाचे विकार बळावू शकतात. किरकोळ जखमांकडे वेळीच लक्ष द्या.

कन्या
काही गोष्टी जुळवून घ्यावा लागतील. उगाच विरोधाला विरोध करत बसू नका. अधिकाराचा योग्य वापर करा. वेळेचे योग्य नियोजन करावे. रागावर नियंत्रण ठेवा.

तूळ
उष्णतेच्या तक्रारी जाणवू शकतात. तिखट व तामसी पदार्थ खाण्याची इच्छा होईल. कमी श्रमातील कामाकडे लक्ष द्याल. अचानक धनलाभाची शक्यता. भांडकुदळ व्यक्तींपासून दूर रहा.

वृश्चिक
वैवाहिक सौख्यात भर पडेल. मुलांचे स्वतंत्र विचार समजून घ्यावेत. कसरत करण्याकडे अधिक कल राहील. संपर्कातील लोकांशी मैत्री वाढेल. मानसिक अशांततेच्या आहारी जाऊ नका.

धनू
कौटुंबिक गोष्टी प्राधान्याने सोडवा. दुचाकी वाहन चालवताना अधिक काळजी घ्यावी. संघर्षमय वातावरणाचा ताण कमी करा. जमिनीच्या कामातून लाभ होईल. मनात शंकेला थारा देऊ नका.

मकर
सारासार विचार करून निर्णय घ्या. स्वमतावर आग्रही राहाल. प्रतिकूलतेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. संघर्षमय स्थिती निवळण्याचा प्रयत्न करा. इतरांवर फार विसंबून राहू नका.

कुंभ
अती उदारपणा दाखवणे योग्य नाही. बोलताना शब्दांचे वजन लक्षात घ्या. स्वभावात काहीसा लहरीपणा येईल. दिवसभर काही न काही खटपट करत रहा. मनाजोगी खरेदी करता येईल.

मीन
उद्दिष्ट साध्य करण्यासाठी झटाल. वाहन वेगावर नियंत्रण ठेवा. नवीन उर्जेने कामे हाती घ्या. स्वतंत्र विचार करण्यावर अधिक भर द्या. कौटुंबिक प्रश्न प्राधान्याने हाताळा.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button