नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून विकास कामांना गती : सचिन पाटील वराळ

रेनवडी येथे विविध विकास कामांचे उदघाटन
दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी :
सत्ता असो किंवा नसो विकासकामे करण्यासाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे सातत्याने पाठबळ मिळत असल्याने तालुका विकासाला गती मिळणार असल्याने प्रतिपादन संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांनी व्यक्त केले आहे.
जिल्हा परिषद सदस्या श्रीम.पुष्पाताई संदीप वराळ पाटील यांच्या निधीतून जनसुविधा योजने अंतर्गत मौजे.रेनवडी ता.पारनेर येथे स्मशानभूमी विकास करणे या कामाचा लोकार्पण सोहळा संदिप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांच्या शुभहस्ते पार पडला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रेनवडी गावचे सरपंच श्रीकांत डेरे हे होते.तसेच कार्यक्रम प्रसंगी माजी सरपंच भिवसेन येवले,उपसरपंच बाबासाहेब येवले, माजी चेअरमन मनाजी येवले,सोसायटी संचालक हनुमंत डेरे,बाळशिराम डेरे,ग्रामसेवक एच.एम.काळे,लेखनिक किसन जाधव,सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र डेरे, संदीप भोर, निघोजचे उपसरपंच माऊली वरखडे, मळगंगा ट्रस्टचे विश्वस्त भास्कर वराळ, ग्रा.पं.सदस्य अस्लम इनामदार, ठेकेदार निलेश घोडे, गणेश डेरे, दिपक भोर, मधुकर येवले, अंकुश भोर,राजाराम येवले, दिनेश डेरे, गुलाब येवले, विक्रम डेरे, मोतीराम येवले, निलेश येवले, संतोष येवले, अशोक येवले, रामदास येवले, विक्रम येवले, सखाराम येवले, कैलास येवले, दिगंबर गाजरे, नीलेश्र्वर येवले, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. वराळ पाटील म्हणाले जिल्हा परिषद, पंचायत समिती माध्यमातून मोठ्या प्रमाणात पाच वर्षात विकासकामे झाली असून सर्वपक्षीयांना या विकासकामांत प्राधान्य देण्याचे काम आपण केले असून विकासकामांमध्ये राजकारण न आणता आपण विकासकामांना प्राधान्य देण्याचे काम केले आहे. यापुढे सुद्धा जनविकासाभिमुख कामे हेच धोरण असल्याने व नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आशिर्वादाने विकासकामांची गती वाढणार असून विखे पाटील यांचे मिळणारे पाठबळ हीच आपली विकासकामांची उर्जा असल्याची ग्वाही वराळ पाटील यांनी दिली आहे.