प्राचार्य .टि एन कानवडे यांना आदिवासी सेवक पुरस्कार प्रदान!

विलास तुपे
राजूर /प्रतिनिधी:
नाशिक येथे कवी कालिदास कला मंदिर येथे झालेल्या महाराष्ट्र शासनाचा आदिवासी समाजसेवक पुरस्कार आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते प्रदान करणयात आला.
सत्यनिकेतन संस्थेचे सचिव तथा ॲड मनोहरराव देशमुख महाविद्यालयाचे माजी प्राचार्य टी एन कानवडे यांना शासनाचा आदिवासी विकास विभागाचा आदिवासी सेवक पुरस्कार सोहळा संपन्न झाला.
राज्यात आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय काम करणा-या व्यक्तींना व सामाजिक संस्थांना प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने राज्य शासनामार्फत आदिवासी सेवक पुरस्कार व आदिवासी सेवा संस्था पुरस्कार राज्य सरकार दरवर्षी प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव करत असते.
चार वर्षांतील एकत्रित पुरस्कार आदिवासी विकास विभागाने नुकतेच प्रदान केले.
कानवडे यांनी सन १९९३-९४ पासून आदिवासी भागातील राजूर येथील ॲड मनोहरराव देशमुख महाविद्यालयात प्राचार्य म्हणून शैक्षणिक व सामाजिक कामास सुरुवात केली.या काळात त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी व सामाजिक कामात वेगवेगळे उपक्रम राबविले आहे. आदिवासी सेवक पुरस्कार आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांच्या हस्ते स्वीकारताना माजी प्राचार्य टी एन कानवडे सौ अलका कानवडे व अजय कानवडे यांचे सह
सत्यनिकेतन परिवार व महाविद्यालयीन कर्मचारी व राजूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
आदिवासी सेवक पुरस्कार आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांच्या हस्ते स्वीकारताना माजी प्राचार्य टी एन कानवडे सौ अलका कानवडे व अजय कानवडे छाया .विलास तुपे राजूर