इतर

अकोल्यात महालक्ष्मी मंदिरात  दर्शनासाठी अबालवृद्धांची गर्दी


अकोले/प्रतिनिधी-

अकोले येथील महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सकाळ -संध्याकाळ दर्शनासाठी अबालवृद्धांची मोठी गर्दी होत आहे.देवस्थानच्या वतीने  विविध  धार्मिक,सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिर परिसरात केलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईने भाविकांचे लक्ष्य वेधून घेत आहे. 

अकोले शहरापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर अकोलेकरांचे श्रद्धास्थान असणारे महालक्ष्मीचे मंदिर आहे. दरवर्षी नवरात्रात येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. महालक्ष्मी देवस्थान ट्रस्टने मंदिर परिसरात अलीकडच्या काळात अनेक सुधारणा केल्या आहेत. मोठा  सभा मंडप ,आकर्षक  टाईल्स  ,दीपमाळ ,नवीन कलश ,संरक्षक भिंत ,पाण्याची टाकी,प्रवेशद्वार  यामुळे या मंदिराचे रूपच पालटले आहे. महालक्ष्मी मंदिर परिसराचा चेहरा मोहरा बदलला आहे.  नवरात्रोत्सवा निमित्ताने देवस्थान ट्रस्ट व आधार रक्तपेढी संगमनेर च्या वतीने  आयोजित रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. पहिल्या माळे पासूनच दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. मंदिर परिसरात लहान मोठी अनेक दुकाने थाटली आहेत. त्यामुळे या परिसराला यात्रेचेच स्वरूप प्राप्त झाले आहे.


महालक्ष्मी देवस्थानचा “क “वर्ग तिर्थक्षेत्रात समावेश होण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे.माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या  मार्गदर्शनाखाली महालक्ष्मी रस्त्याच्या कामास व  दुतर्फा गटारी या कामास लवकर सुरुवात होणार आहे. ट्रस्ट च्या वतीने आगामी काळात भाविकांसाठी  भक्त निवास ,स्वच्छतागृह उभारणार येणार असून कार्यालय सुरु केले जाणार असल्याची माहिती ट्रस्ट चे सचिव तथा अकोले नगरपंचायत चे उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांनी दिली.


श्री क्षेत्र महालक्ष्मी देवस्थान च्या विकासासाठी जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती कैलासराव वाकचौरे ,ट्रस्ट चे अध्यक्ष किसनराव लहामगे , सचिव बाळासाहेब वडजे ,खजिनदार   बाळकृष्ण लोंढे,विश्वस्त रमेश नाईकवाडी ,संजय जाधव ,निलेश देशमुख ,अमोल वैद्य ,रामनिवास राठी ,सुरेश लोढा  ,शिवाजी वडजे ,भानुदास वाकचौरे,सुधाकर शाळीग्राम ,शिरीष देशपांडे ,दत्तात्रय वाणी, ,अनिल गायकवाड ,सुरेश शिंदे,अनिल जोशी,सुनील कोटकर , संतोष कचरे ,प्रकाश देशमुख ,, रोहिदास धुमाळ, हेरंब कुलकर्णी ,  मधुकरराव बिबवे , श्रीनिवास रेणूकदास, पी के शिंदे,भगवान वाकचौरे, विनोद रासने,नानासाहेब भालेराव, अनिल गाडे,सर्जेराव फटांगरे ,डॉ विराज शिंदे,अशोक सावंत, सुरेश खांडगे ,  प्रा अनिल मंडलिक,संतोष बाणाईत,नितीन गायकवाड ,संपत गायकवाड, मंगेश भरीतकर, दत्ता गायकवाड,निखिल भरीतकर ,बाळासाहेब भरीतकर, मंगेश गायकवाड ,ज्ञानेश्वर गायकवाड ,संतोष भोत,नारायण गायकवाड,अमोल भरीतकर आदी देवस्थानच्या विकासासाठी प्रयत्नशील आहेत.

—-

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button