
पुणे-अपघातातील गाडी परत करण्यासाठी दीड लाखाची लाच मागणारा पोलीस अधिकारी अँटी करप्शन च्या जाळ्यात अडकला
आरोपी नरेंद्र लक्ष्मण राजे वय -54
सहा.पोलीस उप निरीक्षक , चिखली पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड असे या पोलीस अधिकऱ्याचे नाव आहे त्याला लाच स्वीकारताना अटक केली
दिनांक 17/12/2023 रोजी चिखली पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड येथे ही घटना घडली
या घटनेतील तक्रारदार यांच्या गाडीचा अपघात झालेला होता. सदर अपघाताबाबत चिखली पो स्टे येथे गुन्हा दाखल आहे. सदर अपघातातील गाडी तक्रारदार ह्याना परत करण्यासाठी यातील आलोसे यांनी सुरुवातीला दीड लाख रुपयांची मागणी केली होती .तडजोडीत एक लाख रुपये ठरले. त्यापैकी 13/12/23 रोजी 15000/- रुपये व. दिनाक 15/12/23 रोजी 55000/- रुपये या पोलीस अधिकारी यांने घेतलेले आहेत. आज रोजी उरलेल्या रक्कमेची मागणी करून 20000/- रुपये लाचेची रक्कम पंचासमक्ष स्वीकारल्यावर त्याना रंगेहाथ पकडण्यात आले आहे
सदरबाबत चिखली पोलीस स्टेशन, पुणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
➡ सापळा पथक :-
पोलीस निरीक्षक – श्री. प्रसाद लोणारे,
पोशि भूषण ठाकूर , .
पो शि सुराडकर
चालक पो हवा चव्हाण ला.प्र.वि. पुणे. यांनी ही कारवाई केली
➡ मार्गदर्शन अधिकारी :-
श्री. अमोल तांबे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र. डॉ.शीतल जानवे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे. नितिन जाधव. पोलीस उप अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे.