जनसंघर्ष संघटना आणि दूध उत्पादककांची, दुग्ध विकास मंत्री विखे पाटील याचे सोबत बैठक..

दुधाला ३४ रुपये भाव न देणाऱ्या दूध संघ वर फौजदारी कारवाई करणार.
अकोले प्रतिनिधी
जनसंघर्ष संघटना आणि दूध उत्पादक शेतकरी यांचीआज, दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सोबत बैठक झाली..दुधउत्पादक कांच्या मागण्यांबाबत पुढील
सकारात्मक चर्चा झाली……
संघटनेने ,दुधासाठी 5 रुपये अनुदान देण्याची मागणी केली, त्यावर 2ते3 दिवसात निर्णय 100% होणार…
2. दुधाला 34 .रुपये , बाजार भाव न देणाऱ्या दूध संघ वर उद्यापासून फौजदारी कारवाई करणार..
3..भेसळ व रकारवाई करण्याचे अधिकार दुग्ध विकास खात्याला नसल्याने , अन्न भेसळ चे अधिकार दुग्ध विकास खात्याकडे 2 ते3 दिवसात घेणार.व भेसळ करणाऱ्या दूधसंघ ह्यांच्यावर कडक कारवाई करणार ….
4. – 3.2./8.5 ला कमी होणार deduction rate…1 रुपये ने कमी न होता… दोन्ही 20 पैसे सारखा ठेवण्यासाठी प्रयत्न करणार..
5. – 3.2/8.3.. दुधाला. हमीभाव देण्यासाठी निर्णय घेणार..
6. पशुखाद्याचे बाजार भाव.15% कमी होण्यासाठी प्रयत्न करणार…
यावेळी जनसंघर्ष संघटनेचे अध्यक्ष संदीप दराडे,सचिव महेश सोनवणे,,कार्याध्यक्ष निलेश गवांदे,,नाना साहेब धुमाळ, मिलिंद नाईकवाडी,डॉक्टर मोहन पवार, योगेश गुंजाळ, ऋषी गुंजाळ,नितीन डुंबरे आधी सदस्य उपस्थित होते..
