कळस येथील पुंजा वाकचौरे यांचे निधन

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील कळस बु. येथील प्रगतशील शेतकरी पुंजा बापु वाकचौरे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. ते थोरले या नावाने सुपरिचित होते
त्यांच्या पश्चात एक मुलगा भाजपाचे जिल्हा सोशल मीडिया सेलचे संयोजक व जय किसान दूध संस्थेचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख भाऊसाहेब वाकचौरे ,मुलगी मनिषा बाळासाहेब वाडेकर, पत्नी, सुन, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
अंत्यविधी प्रसंगी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्हा. चेअरमन माधवराव कानवडे, जेष्ठ नेते पांडुरंग घुले, वसंतराव देशमुख, पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ विश्वासराव आरोटे, जिल्हा परिषद अर्थ बांधकाम समितीचे सभापती कैलासराव वाकचौरे जिल्हा परिषद गटनेते जालिंदर वाकचौरे, अमृतसागर दूध संघाचे व्हा. चेअरमन रावसाहेब वाकचौरे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, भाजपा जिल्हा सरचिटणीस सिताराम भांगरे, रिपाई राज्यसचिव विजयराव वाकचौरे, अगस्ती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त दीपक महाराज देशमुख, अगस्ती देवस्थानचे विश्वस्त गणेश महाराज वाकचौरे ह.भ.प अरुण महाराज शिर्के, पत्रकार समितीचे जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य, रोटरी क्लबचे अध्यक्ष विद्याचंद्र सातपुते, गोकुळ शेठ लांडगे, शिवसेना तालुकाप्रमुख संजय वाकचौरे, भाजपा तालुकाध्यक्ष यशवंत आभाळे राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष सुरेश गडाख, भाजपा संगमनेर तालुका अध्यक्ष वैभव लांडगे आदी उपस्थित होत