इतर

सत्यनिकेतन संस्था स्तरीय गणित,विज्ञान प्रदर्शन संपन्न.

वैज्ञानिक प्रतिकृती कौशल्याला वाव देणाऱ्या ठरतील – टी.एन.कानवडे.



अकोले/प्रतिनिधी


विज्ञान प्रदर्षण विदयार्थ्यांच्या सुप्त गुणांना दिशा देणारे व्यासपीठ असुन विदयार्थ्यांनी तयार केलेल्या वैज्ञानिक प्रतिकृती भावी काळात कौशल्याला वाव देणाऱ्या ठरतील असा आशावाद सत्यनिकेतन संस्थेचे सचिव टी.एन.कानवडे यांनी व्यक्त केला.

राजूर येथे सत्यनिकेतन संस्था स्तरावर गणित व विज्ञान प्रदर्षणाचे आयोजन केले होते.यावेळी सचिव श्री.कानवडे अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

याप्रसंगी संचालक प्रकाश टाकळकर,विजय पवार,व्यवस्थापक प्रकाश महाले,मॉडर्न हायस्कुलचे उपप्राचार्य दीपक जोंधळे,धामनवण प्राजक्ता विदयालयाचे मुख्याध्यापक सचिन वाकचौरे,मा.मधुकरराव पिचड विदयालय राजूरचे प्राचार्य कैलास तेलोरे,बादशहा ताजणे,माजी प्राचार्य मनोहर लेंडे,लहानु पर्बत,प्राचार्य भाऊसाहेब बनकर,पर्यवेक्षक सदाशिव गिरी,विज्ञान शिक्षक रविंद्र मढवई,अमोल तळेकर,रोहिणी सानप,नानासाहेब शिंदे यांसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सचिव टी.एन.कानवडे यांनी पुढे मार्गदर्शन करताना विज्ञानाच्या प्रगतीमुळे भारताची महासत्तेकडे वाटचाल सुरू असून विद्यार्थांमधून शास्त्रज्ञ तयार व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त करत सर्व विद्यार्थ्यांना प्रदर्षण पहाण्याचे आव्हान केले.
संचालक प्रकाश टाकळकर यांनी माहिती तंत्रज्ञानातील प्रगती ही विज्ञानामुळे शक्य झाली आहे.त्यासाठी वैज्ञानिक दृष्टीकोन जपने,वेगवेगळ्या बदलांना सामोरे जाने आवश्यक असून विज्ञान प्रदर्षणामुळे व्यक्तिमत्वाला आकार मिळतो त्यामुळे शिक्षणाच्या संधीचे सोने करा असे प्रतिपादन केले.


उपप्राचार्य दीपक जोंधळे यांनी स्वतःकडे पहा,निरिक्षण करा.वैज्ञानिक प्रयोगातुन विचार करण्याची क्षमता,वैचारीक प्रभलता,काटेकोरपणा,शिस्त,नियमितपणा,व्यक्तिविकासाला पुरक क्षमता निर्माण होतात.असे विचार व्यक्त करून भविष्यात चांगले नागरीक तयार होण्यास मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.संतराम बारवकर यांनी केले तर प्राचार्य भाऊसाहेब बनकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

यावेळी विदयार्थांनी एकूण ८७ उपकरणे प्रदर्षणात मांडले होते.प्राचार्य कैलास तेलोरे व सचिन वाकचौरे यांनी परिक्षण केले.यामध्ये ९ ते १२ विज्ञान शिंदे सार्थक दशरथ-Groundnut cutter machine (खिरविरे)प्रथम,मढवई अपेक्षा रविद्र-Fishary (राजूर)द्वितीय, अल्पेग्ज अश्पाक खाटीक-Anti-sleeping Alarm(राजूर)तृतीय,
९ ते १२ गणित डगळे रोहिदास तुकाराम-search date & Day(खिरविरे)प्रथम, सोनवणे साहिल मनोज-App of maths in forensics science(राजूर)द्वितीय, काळे आशिष नितिन-Ramanujan’s Magic Maths(राजूर)तृतीय ६ ते ८ विज्ञान
साबळे आयुष राजेविनोद – Handwash(राजूर)प्रथम,
लहामगे सोहम ललित – waterFilter(राजूर),
तनुजा दिलीप महाले-Waterfilter(राजूर) व
खुश ब्रिजेश आदेश -Smart toilet(राजूर)द्वितीय,
दुमेरा अन्वर मनियार -Solar Eclipse and moon Eclipse
( खिरविरे)तृतीय ६ ते ८ गणित
धिंदळे ऋतुजा दिनकर – Basic Concept Geometry Magie (राजूर)प्रथम,
अनुज राहुल देशपांडे -magic maths(राजूर)द्वितीय,
भगत दिपक लक्ष्मण – circle(कातळापुर)तृतीय,
५ वी गणित वंजारी सोहम दिपक – magical math Scale(राजूर)प्रथम,सदगिर अपेक्षा शिवाजी -Mathmatical Toys(राजूर)द्वितीय,
नेटावटे अनुष्का हरिश्चंद -mathmatical Toys(राजूर) व लहामगे श्रेयश मामिर्क – cube(राजूर)तृतीय,
५ वी विज्ञान चेतन गोरख हिले -Lungs (राजूर)प्रथम,आयुषराजे उमेश चोथवे – wind energy (राजूर)द्वितीय,नरेंद्र पांडुरंग बारामते -Solar Energy(राजूर)तृतीय क्रमांक.आदी विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button