इतर

आजचे पंचांग व राशिभविष्य दि.०१/११/२०२४

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- कार्तिक १० शके १९४६
दिनांक :- ०१/११/२०२४,
वार :- भृगवासरे(शुक्रवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:३०,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०५:५५,
शक :- १९४६
संवत्सर :- क्रोधी
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- हेमंतऋतु
मास :- अश्विन
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- अमावास्या समाप्ति १८:१७,
नक्षत्र :- स्वाती समाप्ति २७:३१,
योग :- प्रीति समाप्ति १०:४१,
करण :- किंस्तुघ्न समाप्ति –:–,
चंद्र राशि :- तुला
रविराशि – नक्षत्र :- तुला – स्वाती,
गुरुराशि :- वृषभ,
शुक्रराशि :- वृश्चिक,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- आनंदी दिवस,

✿राहूकाळ:- सकाळी १०:४७ ते १२:१३ पर्यंत,

लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०७:५६ ते ०९:२१ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०९:२१ ते १०:४७ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी १२:१३ ते ०१:३८ पर्यंत,

❀ दिन विशेष:-
लक्ष्मी कुबेर पूजन, अभ्यंगस्नान, अलक्ष्मी निस्सारण, महावीर निर्वाण दिन, दर्श अमावास्या, उल्कादर्शन, अन्वाधान,
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- कार्तिक १० शके १९४६
दिनांक = ०१/११/२०२४
वार = भृगवासरे(शुक्रवार)

मेष
नातेवाईक भेटीला येतील. आजचा दिवस मजेत जाईल. आपले विचार सर्वांसमोर निर्भयपणे मांडाल. त्रास देणार्‍या लोकांपासून दूर राहावे. महिलांना अधिक श्रम घ्यावे लागतील.

वृषभ
आजचा दिवस नवीन ऊर्जा देणारा असेल. फिरायला जाण्याचे प्लॅनिंग कराल. विद्यार्थ्यांना आव्हानात्मक दिवस. कौटुंबिक जीवनात चांगले परिणाम मिळतील. प्रेमी मंडळींना चांगला दिवस.

मिथुन
कौटुंबिक आनंद मिळवाल. घरातील तक्रारी मिटवाल. आईच्या तब्येतीत फरक दिसून येईल. नवीन खरेदीचा आनंद घ्याल. नवीन वाहन घेण्याची इच्छा मनात जागृत होईल.

कर्क
घरातील जबाबदारी उत्तमरीत्या पेलाल. तुमचा मान वाढेल. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. लहानांसोबत वेळ घालवाल. अति विचार करू नका.

सिंह
बोलण्यातून प्रभाव पाडाल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. व्यवसायिकांना चांगला लाभ होईल. कार्यक्षेत्रातून भेटवस्तू मिळतील. इतरांच्या विचारांना देखील प्राधान्य द्या.

कन्या
आजचा दिवस धावपळीचा असेल. परंतु मानसिक सौख्य लाभेल. कामे पूर्ण झाल्याने समाधानी असाल. आवडीच्या वस्तु खरेदी कराल. बजेट बिघडणार नाही याची दक्षता घ्या.

तूळ
पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. परंतु हा पैसा घरातील गोष्टींवर खर्च होईल. खरेदीचा मनापासून आनंद घ्याल. व्यवसायिकांना दिवस चांगला जाईल. दूरवर व्यापार विस्तार करता येईल.

वृश्चिक
मानसिक चंचलता जाणवेल. आपल्या मतांवर ठाम राहावे. इच्छा नसताना प्रवास करावा लागेल. प्रवास फायदेशीर ठरेल. थकवा दूर पळून जाईल.

धनू
घरातील लोकांसोबत अधिक वेळ घालवाल. नवीन संधी सोडू नका. घरातील लोकांना खुश कराल. अधिकारी व्यक्तींचा सल्ला घेता येईल. वरिष्ठांशी महत्त्वाची बोलणी करता येतील.

मकर
कामाच्या ठिकाणी चांगले परिणाम पहायला मिळतील. थोरांची सेवा करण्याची संधी मिळेल. वेळेचा सदुपयोग करून घ्यावा. रखडलेली कामे पूर्ण करता येतील. घरातील वातावरण चांगले राहील.

कुंभ
आज अचानक धनलाभाची शक्यता आहे. गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. धार्मिक स्थळांना भेट देता येईल. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत. पोटाचे विकार संभवतात.

मीन
अति विचार करत बसू नका. मानसिक चंचलता जाणवेल. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी. सामाजिक स्तर सुधारेल. वैवाहिक जीवनातील कटुता टाळावी.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button