अॅड शिवाजीराव काकडे ‘युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल अमेरिका’ विद्यापीठाकडून “डी.लिट” पदवीने सन्मानित

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्यात शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अॅड विद्याधर उर्फ शिवाजीराव काकडे यांना नुकतीच ‘युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल अमेरिका’ या विद्यापीठाकडून आंतरराष्ट्रीय दर्जाची “डी.लिट” या पदवीने सन्मानित करण्यात आले आहे.
आज दि.(२८) रोजी शेवगाव येथे आबासाहेब काकडे शिक्षण समूहाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते .दत्तात्रय आरोटे हे होते.
यावेळी शैक्षणिक विभाग प्रमुख प्रा.लक्ष्मण बिटाळ, प्राचार्य संजय चेमटे, सुनील आव्हाड, डॉ.मच्छिंद्र फसले, संपतराव दसपुते, करमसिंग वसावे, वंदना पुजारी, अंजली चिंतामणी, प्रतिमा अकोलकर, अरुण चोथे, गणपत शेलार, रामेश्वर पालवे तर कार्यकर्ते राजेंद्र पातकळ, सुरेश चौधरी, राजेंद्र पोटफोडे, रघुनाथ सातपुते, नवनाथ साबळे, अशोक ढाकणे, अकबर भाई शेख, रामजी पोटफोडे, राम मडके यांच्यासह अनेक मान्यवर प्रमुख उपस्थित होते.
यावेळी ॲड.काकडे सत्काराला उत्तर देताना म्हणाले की, १९४५ सालापासून काकडे कुटुंब शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहे. तर हा माझा सत्कार नसून आबासाहेब व त्यांच्यासोबत काम करणाऱ्या शिक्षकांचा आहे. मातोश्री निर्मलाताई यांचेकडून मिळालेली प्रेरणा मुळेच मला काम करण्यास ऊर्जा मिळत आहे. त्यामुळे मी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाबद्दल ऋण व्यक्त करतो. माझा पुरस्कार आबासाहेब, आणि शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या पुढे नतमस्तक होऊन मी त्यांना अर्पण करतो असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.
———