आजचे पंचांग व राशिभविष्य दि २६/१२/२०२३

:
🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- पौष ०५ शके १९४५
दिनांक :- २६/१२/२०२३,
वार :- भौमवासरे(मंगळवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:५९,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०५:५९,
शक :- १९४५
संवत्सर :- शोभन
अयन :- उत्तरायण
ऋतु :- हेमंतऋतु
मास :- मार्गशीर्ष
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- पौर्णिमा समाप्ति ३०:०३,
नक्षत्र :- मृग समाप्ति २२:२१,
योग :- शुक्ल समाप्ति २७:२१,
करण :- विष्टि समाप्ति १७:५२,
चंद्र राशि :- वृषभ,(०९:५७नं. मिथुन),
रविराशि – नक्षत्र :- धनु – मूळ,
गुरुराशि :- मेष,
शुक्रराशि :- वृश्चिक,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- संध्या. ०६नं. चांगला दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी ०३:१४ ते ०४:३७ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ११:०७ ते १२:३० पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी १२:३० ते ०१:५२ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०३:१४ ते ०४:३७ पर्यंत,
❀ दिन विशेष:
श्री दत्तात्रेय जयंती, आग्रहायणी, कुलधर्म, प्रत्यवरोहण, अन्वाधान, भद्रा १७:५२ प., यमघंट २२:२१ नं.,
————–
: 🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- पौष ०५ शके १९४५
दिनांक = २६/१२/२०२३
वार = भौमवासरे(मंगळवार)
मेष
मनातील जुनी इच्छा पूर्ण कराल. महिला मनाजोगी खरेदी करतील. गुंतवणुकीचे पर्याय समोर येतील. अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्यावा. सामाजिक स्तरावर मान मिळेल.
वृषभ
कामाच्या ठिकाणी अति घाई करू नका. वेळेचे महत्त्व लक्षात घ्या. वडीलांचे मोलाचे मार्गदर्शन मिळेल. व्यावसायिक ठिकाणी नवीन योजना आमलात आणाल. सहकार्यांची मने जिंकून घ्याल.
मिथुन
आजचा दिवस मनाजोगा जाईल. आध्यात्मिक कामातून समाधान लाभेल. धार्मिक स्थळी मन रमेल. दानधर्म कराल. उच्च शिक्षणाचा मार्ग खुला होईल.
कर्क
गूढ गोष्टी जाणून घ्याल. मानसिक चंचलता जाणवेल. भावनेला आवर घालावी लागेल. अति विचार करत बसू नका. अनपेक्षित लाभाची शक्यता.
सिंह
काही सकारात्मक बदल घडून येतील. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. मनातील कडवटपणा दूर होईल. काही नवीन मार्ग सापडतील. जनसंपर्कात वाढ होईल.
कन्या
खोटी स्तुती करणार्यांपासून सावध राहावे. आपले निर्णय आपणच घ्यावेत. इतरांवर फार विसंबून राहू नका. बुद्धीला योग्य मार्गाला लावावे. वादाचे प्रसंग टाळावेत.
तूळ
आनंदाची अनुभूति मिळेल. विद्यार्थ्यांना दिवस चांगला जाईल. अनुभवी व्यक्तींची मदत घेता येईल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. वातावरण सकारात्मक राहील.
वृश्चिक
कुटुंबासमवेत फिरायला जाल. दिवस आनंदात घालवाल. घरासाठी काही नवीन खरेदी करता येईल. प्रवास मजेत पार पडेल. नोकरदारांना दिवस चांगला जाईल.
धनू
जोडीदाराच्या मदतीने कामे पूर्ण कराल. तुमच्यातील आत्मविश्वास वाढीस लागेल. कामाच्या ठिकाणी शुभ परिणाम पाहायला मिळतील. भावंडांशी संबंध सुधारतील. शेजार्यांना मदत कराल.
मकर
बोलण्यात गोडवा राखून कामे करून घ्याल. आळस झटकावा लागेल. जुन्या गोष्टी उकरून काढू नका. जोडीदार तुमच्यावर खुश होईल. पारंपरिक कामातून लाभ संभवतो.
कुंभ
मानसिक अस्थिरता दूर होईल. मनाला येईल तसे वागाल. आज समाधानाला अधिक महत्त्व द्याल. ध्यान धारणेला प्राधान्य द्यावे. क्षुल्लक गोष्टींना फार महत्त्व देऊ नका.
मीन
अति विचारात वेळ वाया घालवू नका. सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा. परदेशी भाषा शिकण्याची आवड निर्माण होईल. कर्जाची प्रकरणे आज टाळावीत . आध्यात्मिक क्षेत्रात काम करणार्यांना दिवस चांगला जाईल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर