इतर

आजचे पंचांग व राशिभविष्य दि २७/१२/२०२३

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- पौष ०६ शके १९४५
दिनांक :- २७/१२/२०२३,
वार :- सौम्यवासरे(बुधवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०७:००,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०५:५९,
शक :- १९४५
संवत्सर :- शोभन
अयन :- उत्तरायण
ऋतु :- हेमंतऋतु
मास :- मार्गशीर्ष
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- प्रतिपदा समाप्ति ३०:४७,
नक्षत्र :- आर्द्रा समाप्ति २३:२९,
योग :- ब्रह्मा समाप्ति २६:४१,
करण :- बालव समाप्ति १८:२१,
चंद्र राशि :- मिथुन,
रविराशि – नक्षत्र :- धनु – मूळ,
गुरुराशि :- मेष,
शुक्रराशि :- वृश्चिक,
राशिप्रवेश :- मंगळ – धनु २४:२०,
शुभाशुभ दिवस:- चांगला दिवस,

✿राहूकाळ:- दुपारी १२:३० ते ०१:५३ पर्यंत,

लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०७:०० ते ०८:२३ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०८:२३ ते ०९:४५ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी ११:०८ ते १२:३० पर्यंत,
लाभ मुहूर्त — संध्या. ०४:३७ ते ०५:५९ पर्यंत,

❀ दिन विशेष:
इष्टि,
————–

: 🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- पौष ०६ शके १९४५
दिनांक = २७/१२/२०२३
वार = सौम्यवासरे(बुधवार)

मेष
कुटुंबातील सदस्यांची मदत होईल. मनातील जुनी इच्छा पूर्ण होईल. व्यवसायिकांना चांगला नफा मिळेल. तुम्ही घेतलेली मेहनत वाया जाणार नाही. कामात स्त्रीवर्गाची मदत मिळेल.

वृषभ
आज कामाच्या ठिकाणी सक्रिय राहाल. सामाजिक सेवेत हातभार लावाल. दिवस हसत-खेळत जाईल. मित्रांची ऐनवेळी मदत मिळेल. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल.

मिथुन
आपल्या मनाचा आवाज ओळखावा. इतरांच्या वागण्याचा फार विचार करू नका. योग साधनेला अधिक प्राधान्य द्यावे. कामानिमित्त दूरचा प्रवास संभवतो. व्यावसायिक लोकांनी प्रवासात काळजी घ्यावी.

कर्क
मानसिक तोल सांभाळावा. अति खोलात जाऊ नका. एकांतात वेळ घालवणे पसंत कराल. अनपेक्षित गोष्टी घडू शकतात. आरोग्याकडे लक्ष द्यावे.

सिंह
व्यावसायिक लोकांनी सावधपणे वागावे. कोणावरही विसंबून राहू नका. वैवाहिक सौख्य उत्तम लाभेल. जोडीदाराची प्रगती खुश करणारी असेल. लहान व्यवसायिकांना लाभदायक दिवस.

कन्या
आज जास्त मेहनत घ्यावी लागू शकते. घेतलेल्या प्रयत्नांना लवकरच यश मिळेल. हित शत्रूंवर लक्ष ठेवा. इतरांचा सल्ला फार मनावर घेऊ नका. फसवणुकीपासून सावध राहावे.

तूळ
तुमचे ज्ञान कामी येईल. संयम व विवेकाने वागावे. प्रेमी जीवनाला बहर येईल. सहकार्‍यांची मोलाची साथ लाभेल. सामाजिक स्तरावर अनपेक्षित लाभ मिळतील.

वृश्चिक
घरात अधिक वेळ घालवाल. छान मनमोकळ्या गप्पा होतील. जुने प्रयत्न फळाला येतील. वाहन खरेदीची इच्छा प्रकट कराल. तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल.

धनू
तुमच्यातील सहनशीलता वाढीस लागेल. प्रतिकूलतेतून मार्ग काढता येईल. शांततेने इतरांची मते जाणून घ्या. कामाचा वेग वाढेल. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल.

मकर
गोडीने सर्वांना जिंकून घ्याल. कौटुंबिक प्रगती साधता येईल. आवडते पदार्थ बनवाल. व्यापार्‍यांना अपेक्षित लाभ मिळेल. कौटुंबिक चर्चा सकारात्मक असेल.

कुंभ
जोडीदार तुमच्यावर खुश होईल. तुमचे हट्ट पुरवले जातील. दिवस मनाजोगा घालवाल. सारासार विचार करूनच निर्णय घ्यावा. इतरांच्या सल्ल्याला बळी पडू नका.

मीन
परदेशी कंपनीकडून बोलावणे येईल. विचारांना योग्य दिशा द्यावी. तज्ञ मंडळींचा सल्ला घ्यावा. मानसिक व्यग्रता जाणवेल. उधारी वसुलीसाठी प्रयत्न कराल.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button