श्री राधिका फाउंडेशन, कडून, कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा संपन्न

नाशिक /अंबड
डॉ. शाम जाधव
श्री राधिका फाउंडेशन बहुद्देशीय संस्था, अंबड शाखा कडून, यावर्षी, महिला दिनाचे औचित्य साधून, १११ महिलांचा, अष्टपैलू रत्न अवॉर्ड ने सन्मान करण्यात आला.
हा कार्यक्रम, दिनांक १५ मार्च २०२५ रोजी, दुपारी तीन वाजता, स्वातंत्र्यवीर सावरकर, म्हणजेच क्रॉम्प्टन हॉल, सावता नगर सिडको, नाशिक. येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी, प्रमुख पाहुणे म्हणून,
पश्चिम नाशिकच्या, लाडक्या आमदार, सौ सीमाताई हिरे, अंबड पोलीस स्टेशनचे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, राकेशजी हांडे, ग्लोबल युनायटेड लाईफ टाईम क्वीन, सौ नमिता कोहक, कल्पतरू हॉस्पिटलचे संचालक, श्री वैभवजी महाले. तसेच मिसेस इंडिया २०२४ गोवा, सौ स्मिता अहिरे, इत्यादी प्रतिष्ठित प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी , श्री राधिका फाउंडेशन बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापिका, डॉक्टर चेतनाताई सेवक या होत्या.
तसेच, या कार्यक्रमासाठी काही विशेष मान्यवरांची देखील उपस्थिती होती, साई धनवर्षा बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक श्री संजयजी देशमुख, गुरुवर्य राखीताई मोरे, किन्नर प्रतिष्ठानच्या अध्यक्ष डॉक्टर वैभवी ताई पाटील, राधिका फाउंडेशन चे अध्यक्ष श्री लाला ठक्कर, उपाध्यक्ष सौ वंदनाताई बनकर, निफाड शाखा अध्यक्ष सौ जयश्री भटेवरा, मखमलाबाद शाखा अध्यक्ष श्री डॉ संदीप काकड, श्री कल्याणरावजी पाटील, श्री अरविंदजी सोनवणे, श्री जावेदजी शेख, राधिका फाउंडेशनच्या ब्रँड अँबेसिडर सौ हर्षाली भोसले, जय श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापिका सौ जयश्रीताई चौधरी, रोखठोक रणरागिणी न्यूज च्या संचालिका सौ योगिता घोलप, इत्यादी, प्रतिष्ठित आणि नामवंत व्यक्तींची उपस्थिती देखील, या कार्यक्रमाला होती.
या मान्यवरांच्या हस्ते, या पुरस्कारथी महिलांचा सन्मान झाला.
संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन राधिका फाउंडेशनच्या, अंबड शाखेच्या, अध्यक्षा सौ गायत्री लचके, यांनी केले. आयोजन समितीतील, अंबड शाखा उपाध्यक्ष, सौ सुनिता केदारे, सौ अश्विनी नवले, सौ उज्वला चौधरी, सौ हर्षदा भावसार, सौ आशा सोनावणे, या सर्वांनी विशेष मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, सौ उज्वला चौधरी आणि सौ अश्विनी नवले यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात, प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली, कार्यक्रमाचे प्रास्ताविक गायत्री लचके यांनी केले.

याप्रसंगी, मार्गदर्शन करताना, आमदार सौ सीमाताई, म्हणाल्या की, राधिका फाउंडेशन ही संस्था सातत्याने महिलांसाठी काम करताना दिसते, त्यांच्या कार्याचा नेहमीच सन्मान करते, आदर करते, या पुरस्काराने महिला नक्कीच उत्तेजित होतील आणि त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळेल…
तसेच, कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या, ग्लोबल युनायटेड लाईफ टाईम क्वीन, सौ नमिता कोहक, यांनीही महिलांचे छान आणि मौलिक मार्गदर्शन केले, स्वतःच्या जीवनातील काही कठीण प्रसंग उपस्थित महिलांशी, शेअर करून त्यांच्यातील लपलेले गुण बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले, इतक्या छान कार्यक्रमासाठी, त्यांनी राधिका फाउंडेशनच्या संस्थापिका, डॉक्टर चेतनाताई सेवक आणि अंबड शाखेच्या अध्यक्ष, सौ गायत्री लचके यांचे विशेष कौतुक केले…
अध्यक्षीय भाषण करताना, संस्थापिका डॉक्टर चेतनाताई सेवक, यांनी सर्व पुरस्कारथी महिलांचे अभिनंदन केले, तसेच त्यांनी महिला दिन, हा एकच दिवस साजरा न करता, वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस, साजरा केला जावा असे वक्तव्य केले, आणि महिला स्वतःच किती सामर्थ्यवान असते, हे समजावून सांगितले, प्रास्ताविक मध्ये, सौ गायत्री लचके यांनी असे सांगितले की हा पुरस्कार साठी नामांकन करताना विशेष काळजी घेतली गेली आहे, त्यांचे कार्य पाहून त्यांचे क्रमांक केले गेले आहे, असामान्य अशा एकशे अकरा महिलांना पुरस्कारासाठी नामांकित केले गेले आहे… यासाठी सर्व उपस्थित पुरस्कारार्थी महिलांचे त्यांनी अभिनंदन केले.
संपूर्ण कार्यक्रमादरम्यान अनेक उपस्थित महिलांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले, स्टेजवर येऊन परिचय दिला… आणि पुरस्कारासाठी राधिका फाउंडेशनच्या संपूर्ण टीमचे आभार व्यक्त केले…..