माळीचिंचोरा फाटा येथे गावठी कट्टा व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या आरोपीस नेवासा पोलिसांनी केली अटक
←
माका प्रतिनिधी
दत्तात्रय शिंदे
नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरा फाटा येथे
गोपनीय माहिती मिळाल्यानुसार नेवासा पोलिसांनी
गावठी कट्टा व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या
आरोपीस नेवासा पोलिसांनी गुन्हेगार गावठी
कट्ट्याचा धाक दाखवत असताना जीवावर उदार
होऊन ताब्यात घेतले आहे.
याबाबत पो.कॉ. श्याम बाबासाहेब गुंजाळ यांनी
दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दिनांक
23.05.2023 रोजी पोलीस निरीक्षक शिवाजी
डोईफोडे यांना गुप्त बातमीदारामार्फतीने माहिती
मिळाली की. माळीचिंचोरा फाटा ता. नेवासा
जि. अहमदनगर येथे इसम नामे आकाश संजय
पवार हा बेकायदेशीर गावठी कट्टा व काडतुसे
जवळ बाळगुन फिरत आहे अशी खात्रीलायक
बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक शिवाजी
डोईफोडे यांचे आदेशाने पोलीस स्टेशन नेवासा येथे
नेमणुकीस असलेले पोलीस उपनिरीक्षक समाधान
भाटेवाल, पोलीस कॉन्सटेबल सुमित करंजकर,
पोलीस कॉन्सटेबल शाम गुंजाळ, पोलीस
कॉन्सटेबल गणेश ईथापे व दोन पंच असे सर्वजण
नेवासा पोस्टे येथून खाजगी वाहनाने रवाना होवुन
मिळालेल्या गुप्त बातमीनुसार माळीचिंचोरा फाटा
ता. नेवासा जि. अहमदनगर येथे वेगवेगळ्या
ठिकाणी सापळा लावुन थांबले असता,
त्यानंतर सदर इसमास ताब्यांत घेवुन पोलीस
स्टेशन नेवासा येथे आणुन त्याच्याविरुध्द श्री. शाम
बाबासाहेब गुंजाळ नेमणुक पोलीस स्टेशन नेवासा
यांनी सदर ईसमाविरुध्द फिर्याद दिल्याने त्यावरुन
पोलीस ठाणे नेवासा येथे गु.र.नं 556/2023
भारतीय हत्यार कायदा कलम 3/25, 7/27 (2)
प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्याचा तपास पोलीस
उपनिरीक्षक समाधान भाटेवाल हे करत आहेत.
त्यादरम्यान त्याला त्याचे नाव गाव विचारले
असता, त्याने त्याचे नाव आकाश संजय पवार, वय
23 वर्षे, रा. ब्रम्हतळे / ब्रम्हनगर नागरदेवळे भिंगार
ता. जि. अहमदनगर असे सांगितले त्यानंतर त्याची
अंगझडती घेतली असता, त्याच्या अंगझडती मध्ये
त्याच्या उजव्या हातामध्ये असलेला गावठी कट्टा (
पिस्टल) व पँटच्या डाव्या खिशामध्ये सहा जिवंत
काडतुसे, एक मोबाईल व त्याची वापरती एक
मोटारसायकल असा मुद्देमाल मिळुन आलेला
आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक श्री.
राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर
उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके
, श्री. शिवाजी डोईफोडे पोलीस निरीक्षक यांच्या
मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे.