माजी मंत्री गडाख यांचे हस्ते लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना अभिवादन !

आण्णाभाऊ साठे हे थोर समाज सुधारक- शंकरराव गडाख
आबासाहेब शिरसाठ
नेवासा फाटा.दि 1 . लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती कालिका प्रतिष्ठानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली राज्याचे माजी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले
या प्रसंगी बोलताना ते म्हणाले की लोकशाहीर आण्णाभाऊ साठे हे थोर विचारवंत व लेखक समाज सुधारक ,लोककवी होते दीड दिवस शाळा शिकणाऱ्या अण्णाभाऊंच्या कादंबऱ्या देश विदेशात प्रचलित आहेत त्यांच्या कादंबरीवर अनेक चित्रपटांची निर्मिती झाली आहे त्यापैकी फकीरा, वैजंता , वारणेचा वाघ, टिळा लावते मी रक्ताचा, डोंगरची मैना, अशी अनेक चित्रपट आहेत अण्णाभाऊ हे काँमरेड विचारसरणीचे होते परंतु अण्णाभाऊ वर खरा प्रभाव पडला तो डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा व श्रीपाद अमृत डांगे कार्ल मार्क्सवाद संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये कोकण मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रभर लाल बावठा कला पथकामार्फत लोक जागृती चे कार्य त्यांनी केले शाहिरीमधून संपूर्ण महाराष्ट्राला हादरून टाकणारे शाहीर म्हणजे अण्णाभाऊ साठे यानंतर सामाजिक कार्यकर्ते असे गडाख म्हणाले
रामभाऊ केंदळे म्हणाले अण्णाभाऊंचे खरं नाव तुकाराम भाऊराव साठे परंतु लोक त्यांना अण्णाभाऊ म्हणत अण्णा भाऊंचा जन्म एक ऑगस्ट 1920 रोजी वाटेगाव (तालुका वाळवी जिल्हा सांगली) या गावी झाला त्यांच्या पत्नीचे नाव कोंडाबाई व जयवंत साठे त्यांना तीन आपत्य होते मुलगा मधुकर मुलगी शांता व शकुंतला अण्णाभाऊ साठे कामधंदा साठी मुंबईला आले परंतु त्यांना कोंडाबाईची आठवण येऊ लागली तेव्हा अण्णाभाऊंनी घेतलेलं माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होतीया काहीली हे गीत त्यांचं आजही अजरा अमर आहे त्यांची कष्टकरी कामगार श्रमिका साठी खूप धडपड होती ते म्हणायचे पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून श्रमिकांच्या तळहातावर ठरलेली आहे

या कार्यक्रमाच्या आयोजन सचिन दादा केंदळे यांनी केले याप्रसंगी प्रमुख पाहुणे नगरपरिषद अध्यक्ष नंदकुमार पाटील, सरपंच सतीश दादां निपुंगे नगरसेवक जितेंद्र कुऱ्हे ,पत्रकार आबासाहेब शिरसाठ तसेच इतर मान्यवर व कार्यकर्ते करण केंदळे, विकास लष्करे, अविनाश केंदळे ,दीपक बनसोडे ,अजय केंदळे, योगेश मस्के, तेजस केंदळे ,आकाश केंदळे, संतोष कासोदे, विशाल केंदळे ,अमोल चांदणे, सोनू पवार, अमोल शेलार, दीपक बोरुडे रितेश केंदळे ,अक्षय कुसळकर, विजय मंडलिक, राम शिरसाट, सागर मंडलिक, लखन शिरसाट, गटन्या पवार ,सतीश वाघमारे ,श्याम कनगरे, प्रकाश माने ,सोनू कैलास लष्करे ,अशोक वडागळे, विकास लष्करे ,राजू साळवे, अमोल कापसे ,प्रकाश बनसोडे ,शिवराज पिटेकर ,तेजस लोखंडे, राहुल गाडे, मंगेश केंदळे, अक्षय गाडे ,अविनाश त्रिभुवन ,शरीफ शेख ,अनिल मंडलिक ,रोहित चव्हाण, दत्तू साळवे, विनोद अडागळे, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते
