श्री बाळेश्वर विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

संगमनेर–अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे,श्री बाळेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सारोळे पठार या विद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री .उत्तम खांडवी व शिक्षक यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयात विद्यार्थ्यांची भाषणे, गाणे झाली .विद्यार्थीनींचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता
. ज्योतिबांच्या मनातील पेटत्या ज्योतिला प्रज्वलीत करण्याचे कार्य सावित्रीनेच केले व ती खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांतीची प्रखर ज्योत झाली. असे विचार यावेळी नारायण डोंगरे यांनी व्यक्त केले
यावेळी गंगाधर पोखरकर,सुनिल साबळे,अशोक जाधव,रघुनाथ मेंगाळ,भाऊराव धोंगडे,बाळासाहेब डगळे,संजय ठोकळ,विश्वास पोखरकर,श्रीकृष्ण वर्पे,संतोष भांगरे,आप्पासाहेब दरेकर,चेतन सरोदे,सलालकर,हेमंत बेनके,विठ्ठल फटांगरे मंगेश औटी,उपस्थित होते.
सुत्रसंचालन तनुष्का पोखरकर हिने केले .